राजुरा:-प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर गुन्हे शाखेला तेलंगणा राज्यातून राजुरा येथे बनावट चलनी नोटा हस्तांतरित करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती14जानेवारी रोजी प्राप्त झाली होती. ह्या माहितीच्या आधारे स्थागुशा ने अत्यंत गोपनीय पद्धतीने राजुरा शहरातील आसिफबाद मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग नाजिक सापळा रचून आसिफाबाद(तेलंगाना) येथील निखील भोजेकर नामक व सैफुद्दीन जलाउद्दीन सैय्यद, ह्यांना 40 हजारांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात तब्बल 5 लाख रुपये किंमतीच्या नकली नोटाअदलाबदली करताना रंगेहाथ अटक करूननकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे.
सदर आरोपींनी स्थागुशाच्या खबरीला 40 हजारांच्या बदल्यात 5 लाखांच्या बनावट नोटा देताना ताब्यात घेतले असून आरोपींनी केलेली हातचलाखी देखिल उघडकीस आणली आहे. आरोपींनी खबरीला देण्यासाठी आणलेल्या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँक ऐवजी "भारतीय बच्चो का बँक " असे लिहिले होते मात्र नोटांचा रंग व इतर बऱ्याच गोष्टी हुबेहूब होत्या. आरोपी इतके चतुर होते की त्यांनी आपले बिग फुटू नये ह्यासाठी नोटांच्या बंडल मधे खाली व वरच्या भागात पाचशे रुपयांच्या प्रत्येकी 2 खऱ्या नोटा लावल्या व बाकी 96 नोटा बनावट होत्या हे विशेष.
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस
निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थागुशा येथील सपोनि मंगेश भोयर यांचे सोबत स्थागुशा येथील अंमलदारांचे पथक तयार करून मिळालेल्या माहीतीची खातरजमा करून कारवाई करून आरोपींकडून प्रत्येक बडल चे पुढे व मागे चलनातील दोन 500रू. च्या नोटा अशा एकुण 06 नोटा किंमत3000/- रू., दोन मोबाईल हॅन्डसेट किंमत 75,000/- रू. इंडिका वाहन क्रमांक एमएच
/ 46 / डब्लू / 7545 किंमत 10,00,000/-रू. असा एकूण 75,000/- रू. इंडिका वाहन क्रमांक एमएच 46 डब्लु 7545किंमत 10,00,000/- रू. असा एकुण 10,78,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात केला.
दोन्ही आरोपींविरूध्द पोलीस स्टेशन राजुरा येथे अप. क. 19 / 2023 कलम 420, 34भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाअसुन आरोपीना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत करीत आहे.
सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अप्पर पोलीस
अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखाचंद्रपुर यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, अंमलदार संजय आतकूलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, रविंद्र पंधरे, कुंदनसिंग बावरी, नरेश डाहले चालक प्रमोद उभारे यांनी केली.
0 comments:
Post a Comment