चंद्रपूर : आयुष्यात जगताना आणि प्रगती करताना गरीब असो वा श्रीमंत सर्वाना दिवसभराचे २४ तासच मिळतात. या २४ तासाचा सदुपयोग कसा करावा, हे आपल्यावर अवलंबवून आहे. वेळेचा सदुपयोग करून शिक्षण, कौशल्य, जिद्द आणि मेहनत यावरच त्याचे कर्तृत्व घडते, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
इन्स्पायर तर्फे आयोजित सुपर ३० चे आनंद कुमार यांचा व्याख्यान कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते.Founder of Super 30 Anand Kumar
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सुपर ३० चे संस्थापक आनंद कुमार, इन्स्पायर इन्स्टिट्यूट संस्थेचे संस्थापक प्रा. विजय बदखल, डॉ. आशिष बदखल यांची उपस्थिती होती.Super 30's Anand Kumar's lecture programme.
याप्रसंगी जेईई - नीट या स्पर्धा परीक्षेत चंद्रपुरात उत्कुष्ट निकाल देणाऱ्या इन्स्पायरच्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी इन्स्पायर तर्फे जिल्ह्यातील विविध शाळेतील ५४० विद्यार्थ्यांची इन्स्पायर शाईन आउट या नावाने प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पहिले ३० आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी पुढे बोलतांना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, एका वर्गात ६० विद्यार्थी शिक्षण घेत असतात. पुढे बाहेर नोकरीवर करीत असताना मात्र ते वेगवेगळे वेतन कमवीत असतात. त्यामुळे आपले महत्व वाढविण्यासाठी त्या क्षेत्रातील उच्च शिखर गाठण्याचा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.
0 comments:
Post a Comment