चंद्रपुर : crime news मौजे मिनघरी (मोठी), ता. सिंदेवाही येथे बनावट देशीदारूचा साठा असल्याची खात्रीदायक बातमी समजल्यावरून श्री. विकास थोरात, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा यांनी सदर ठिकाणी दि. १७/०९/२०२३ रोजी पहाटेचे वेळेला अचानक छापा मारला असता उमाजी चंद्रहास झोडे या इसमाचे ताब्यातील चारचाकी वाहनातून बनावट देशीमद्य ९० मिली क्षमतेच्या रॉकेट ब्रँडच्या १००० बाटल्या मिळून आल्या.
गुन्ह्यातील आरोपीस जागीच ताब्यात घेऊन मद्यसाठा व त्याकामी वापरलेली मारुती कंपनीची रिट्स कार असा एकूण रु. २,७०,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचा मद्यसाठा कोठून आणला याबाबत संबंधीताकडे विचारणा केली असता त्याने चंद्रपूर शहरातील एका इसमाचे नाव सांगितले. त्याअनुषंगाने चंद्रपूर येथे तपासकामी गेलो असता मुख्य आरोपीस सुगावा लागल्याने तो फरार झाला असून त्याचा तपास चालू आहे.The sale of fake country liquor is finally exposed
या कारवाईमुळे जिल्ह्यातील बनावट देशीदारू विक्रीच्या मुख्य सूत्रधारांची नावे निष्पन्न झाली असून त्यामध्ये मोठे रॅकेट मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ खाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास मे. न्यायालयापुढे हजर करण्यात आले आहे.
सदर कारवाई ही श्री. मोहन वर्दे, विभागीय उपआयुक्त, रा. उ. शु., नागपूर विभाग, श्री. संजय पाटील, अधीक्षक, रा. उ. शु., चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विकास बी. थोरात, निरीक्षक, रा. उ. शु., वरोरा, श्री. संजय आक्केवार, दु. निरीक्षक, श्री. चंदन भगत, स. दु. निरीक्षक, श्री. उमेश जुंबाडे, जवान, श्री. किशोर पेदुजवार, जवान, श्री. सुजित चिकाटे, जवान व श्री. दिलदार रायपुरे, जवान -नि-वाहनचालक यांनी पार पाडली.
सदरील गुन्ह्याचा पुढील तपास श्री. विकास थोरात, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा हे करीत आहेत.
0 comments:
Post a Comment