स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूलचे खेळाडू राज्य स्तरावर
चंद्रपुर: Stella Mary's Convent School,Bamanwada,Rajura स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूल, बामणवाडा, राजुरा च्या खेळाडूंची राज्य स्तरीय रोड सायकलिंग स्पर्धेकरिता निवड. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा व जिल्हा सायकलिंग संघटनेच्या वतीने २0२२-२३ या वर्षातील नागपूर विभागीय शालेय रोड सायकलिंग स्पर्धा वर्धा येथे पार पडली. या स्पर्धेत शाळेचे खेळाडू चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. कु. अनुष्का फरकाडे ही १४ वर्षाआतिल मुलींमध्ये टाईम ट्रायल या प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला तर मोत्तोसीम शेख यांनी १४ वर्षाआतिल मुलांमध्ये टाईम ट्रायल मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. या दोघांचीही राज्य स्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली, राज्य स्तरीय स्पर्धा पुणे येथे होणार आहे.
0 comments:
Post a Comment