Ads

सिंदेवाही पंचायत समितीचे मग्रारोहयो अंतर्गत कार्यरत अधिकारी, क्लर्क,ऑपरेटर यांच्या प्रलंबित मागण्या करीता कामबंद आंदोलन

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही: - आज दि.18 जानेवारी बुधवार ला सिंदेवाही पंचायत समितीचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कंत्राटी तत्थावर कार्यरत कर्मचारी मा:गील १० ते १२ वर्षापासून प्रामाणिकपणे अखंडीत मग्रारोयोची कामे करीत आहोत. वेळोवेळी वरीष्ठांनी दिलेली कामे व जबाबदारी व्यवस्थीत पार पाडत असुन मग्रारोहयोची कामे वेळेवर पूर्ण करीत आहोत.Work stoppage movement for the pending demands of officers, clerks, operators working under Magrarohoyo of Sindewahi Panchayat Samiti.
कोविड १९ सारख्या महामारीच्या काळातसुध्दा कर्मचारी नियमीत कार्यरत राहुन स्वताच्या जिवाची पर्वा न करता व कोणत्याही शासकिय सुविधा नसतांना सुध्दा मग्रारोहयो अंतर्गत योजनाचे गावामधील प्रत्येक मजुरांना फार मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करून रोजगार दिलेला आहे. असे असतांना सुध्दा मागील ३-४ वर्षापासुन कंत्राटी कर्मचारी यांना कोणतेही मानधन वाढ झालेली नाही.
अनेकदा संघटनेच्या वतीने कंत्राटी कर्मचार्यांनी बहिष्कार टाकलेला होता व मंत्रालयात आपल्या स्तरावरुन सभा आयोजीत केलेली होती त्यामध्ये CSC आपणास कसे उपयुक्त आहे. कंत्राटी कर्मचारी यांना सुचविले होते. परंतु सदर CSC मार्फत कर्मचारी यांना किमान वेतन व वैधानिक वजावटीचा फायदा दिला जात नव्हता हे कारण दाखवुन आपल्याच स्तरावरुन ब्रिक्स इंडीया प्रा.ली. पुणे हि मनुष्यबळ पुरविणारी संस्था दि. ०२ जाने. २०२३ शासन परिपत्रकानुसार लागू करण्यात आली. परंतु सदर कंपणी सुध्दा ID च्या जाळयात अडकल्याची बाब पुढे आलेली आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे असतांना सुध्दा योजनेमध्ये काम करणारे काही निवडक कर्मचारी हे राज्य निधी असोसीएशन मधुनव नियुक्तीसह मानधन घेत आहेत. त्याच धर्तीवर आम्हाला सुध्दा मानधन व नियुक्ती राज्य निधी असोसीएशन मधुन देण्यात यावी. परंतु ऑक्टोबर 2019 पासून आजतागायत कंत्राटी कर्मचारी यांचे मानधनात कोणतीही वाढ झालेली नाही. या करीता रास्त मागण्या पूर्ण न झाल्या मुळे दि. १८ जानेवारी २०२३ रोजी एक दिवसीय संप पुकारुन नाईलाजास्तव आंदोलन करण्यात आला आहे. सदर आंदोलन कालावधी मध्ये योजनेच्या कामात अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासणाची राहील असल्याचाही उपोसनावर बसलेल्या कंत्रीटी कर्मचारयानीं सांगीतले आहे.
*कंत्राटी कर्मचार्यांच्या प्रमुख मागण्या*.
१. मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे.
२. पच्छिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे.
३. योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्य निधी असोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी.
४. ग्राम रोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यात यावे.
५. मध्यप्रदेश शासन प्रमाणे वयाच्या ६२ वर्षा पर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी. इतर मागन्याकरीता सदर सपं पुकारन्यात आला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment