Ads

अरविंदो रियालटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची दादागिरी,बेलोरा गावकऱ्यांनी हाणून पाडली

भद्रावती तालुका प्रतिनिधी:-
भद्रावती तालुक्यातील बेलोरा गावात अरबिंदू रियालटी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे कोळसा उत्खनन करण्याचे काम सुरू होत आहे. यासाठी गावकऱ्यांच्या समस्या व पुनर्वसन व अवार्ड घोषित न करता कंपनीने काम सुरू केले. त्यामुळे गावकऱ्यांनी उठाव करून या कंपनीचे काम बंद पाडले.Bullying of Aurobindo Realty Infrastructure Company, Belora villagers thwarted
भद्रावती येथील बेलोना लगत परिसरात अकरा गावाची 936 एकर जमीन अरबिंदू रियलटी इन्फ्रास्ट्रक्चर खाजगी कंपनीला देण्यात येत आहे. यासाठी कंपनीने स्वतःच्या नावावर असलेल्या काही जमिनीवर बांधकाम करण्याचे काम बेलोरा येथे सुरू केले आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यासमोर दोन वेळा जन सुनावणी झाली आहे. मात्र यामध्ये कोणतेही समस्या सुटल्या नव्हत्या. त्यामुळे बेलोरा, टाकळी, जेना,पानवडाळा अशा महत्त्वाच्या गावाच्या सरपंचांनी सोमवारी सकाळी या कंपनीचे काम बंद पडले. कंपनीतर्फे सिंग यांनी कंपनीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु गावाची पुनर्वसन व एकरी 50 लाख रुपये जमिनीचा मोबदला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कंपनीने कुठलेही काम करू नये अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने तनाव निर्माण झाला होता.

यावेळेस कंपनीतर्फे वानखेडे यांनी बॉडीगार्ड आणून जबरदस्तीने काम करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही गावकऱ्यांनी हात धरून कानशिलात लावताच कंपनीचे वानखेडे व सिंग पोलिसांच्या साहाय्याने तिथून निघून गेले. त्यामुळे अनर्थ टळला.

हाच वाद पुढे घेऊन भद्रावती पोलीस ठाणेदार इंगळे यांच्या दरबारात गेला. यानंतर सुधाकर रोहनकर यांच्या मदतीने कंपनी आणि गावकरी यांच्यात समेट घडवून आणण्यात आला. यामध्ये कंपनीने कुठलेही प्रकारचे काम करू नये असा युक्तिवाद करण्यात आला. व काम बंद करण्यात आले.

यानंतर महिला गावकऱ्यांनी वानखेडे यांच्यावर भाडोत्री आणून महिलांना धक्काबुक्की करण्याच्या प्रकरणात महिलांनी भद्रावती पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.

गावकऱ्यांच्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख सुधाकर रोहनकर यांच्यासह गावातील बेलोरा सरपंच संगीता ताई देहारकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment