Ads

राजमाता जिजाऊ सारखे स्वप्न उराशी बाळगून मुलांना घडवावे -आ.प्रतिभा धानोरकर

भद्रावती:- गुरूनगर येथील लोटस स्कूलच्या वतीने स्थानीय वृंदावन सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थी व पालक यांचा स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. त्यानिमित्तान महिलांनी संस्कारित होऊन मुलांचे संगोपन करावे व राजमाता जिजाऊ सारखे स्वप्न उराशी वाढवून मुलांना घडवले तरच उद्याचे भविष्य उज्वल होऊ शकते," असे मौलिक विचार आ.प्रतिभा धानोरकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटनपर भाषणातून व्यक्त केले.Children should be raised with a dream like Rajmata Jijau -MLA. Pratibha Dhanorkar
लोटस स्कूलचे अध्यक्ष प्रा.भूषण वैद्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुलांतील अज्ञात व सुप्तावस्थेतील गुणांचे संशोधन करून त्यांचा व्यक्तिमत्व विकास केला पाहिजे, आपल्या इच्छा मुलांवर लादून त्यांचे भविष्य अंधकारमय करू नये असे पालकांना आवर्जून सांगितले , तर प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. हेमकांत वाळके यांनी उद्याचा काळ गंभीर आहे त्यांची पाऊले आजच ओळखून पालकांनी सजग राहीले पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष सरिता सूर, माया नारळे माजी नगरसेविका, उमेश नगराळे व प्रवीण पेटकर यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे बाबा यांच्या विचारांवर व कार्यावर प्रकाश टाकून पालकांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका कविता वैद्य (तितरे)यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन मुलांना प्रेरित केले पाहिजे असे मत आपल्या प्रास्ताविकेतून व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश मेश्राम, प्रफुल झाडे, संकेश रामटेके, पंकज चिंचखेडे, मनोज नवघरे, राकेश जुनघरे व प्रफुल काकडे या पालकांनी विशेष सहकार्य केले,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकिळा उपासे व आभार प्रदर्शन मंगला मांडवकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment