चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या काही मोजक्या सवंगड्यांसह स्वराज्याची शपथ घेतली होती. बालपासूनच त्यांच्या मनात असलेल्या या स्वराजनिर्मितीच्या भावना चांदा पब्लिक स्कुलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून उत्तमरित्या मांडल्या. चिमुकल्यांचा हा हृदयस्पर्शी पोवाडा ऐकून आमदार प्रतिभा धानोरकर भारावल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे, रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय जयस्वाल, संतोष तेलंग, आर्किटेक परिणीती मेश्राम, सूर्या मंडल, संस्थाचालक स्मिता जिवतोडे यांची उपस्थिती होती. पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, कोणतीही संस्था मोठी होत असताना तिथे काम करणारे संचालक, टीचर्स आणि कर्मचारी यांच्या योगदानातून वटवृक्षात रूपांतर होते. आज चिमुकल्या बालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे प्रसंग सादर केले. हे बघून आनंद झाला. सभागृहात बोलताना किंवा सभांमध्ये भाषण देतांना मोठ्या व्यक्ती देखील अनेकदा चुकतात. मात्र, या चिमुकल्यांनी अत्यंत निर्भीडपणे आणि धाडसाने कला सादर केली. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी पीढी घडली पाहिजे, असे आवाहन केले.
0 comments:
Post a Comment