तालुका प्रतिनिधी भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील घोळपेठ जवळील सायबन येथील रेल्वे लाईनच्या बाजूला कुजलेल्या अवस्थेत एका अज्ञात इसमाचे प्रेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, आज दिनांक 4 ला भद्रावती तालुक्यातील घोळपेठ जवळील सायवन येथील भद्रावती- चंद्रपूर या रेल्वेनाईलवर एका अज्ञात इसमाचे प्रेत सायंकाळच्या सुमारास आढळून आले. सदर प्रेताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी पाहण्यास तोबा गर्दी केली असून घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळतात भद्रावती पोलीस घटनास्थळी पोहोचले असून प्रेताची प्राथमिक चौकशी करून प्रेताला उत्तरीय तपासणी करता भद्रावती च्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून सदर घटनेविषयी तर्कवितर्क लावले जात असताना भद्रावती पोलीस या घटनेचा कसोशीने तपास करीत असून या घटनेचे तथ्य तपासानंतरच कडेल की हत्या आहे की आत्महत्या.
0 comments:
Post a Comment