Ads

शैक्षणिक प्रगती करीत, लोहार समाजाने उद्योग व्यवसायाकडे वळावे- हंसराज अहीर

चंद्रपुर/ यवतमाळ :- लोहार समाज निर्मितीक्षम असून देशाच्या प्रगतीमध्ये विशेषतः ग्रामीण क्षेत्राच्या उन्नतीत या समाजाचे मोठे योगदान आहे, बदलत्या काळाला अनुसरुन या समाजाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु केली असली तरी हा समाज पारंपारिक व्यवसायापासून दुर जावू शकला नाही. त्यामुळे समाजातील विद्याविभुषित समाज बांधवांनी सामाजिक आर्थिक, शैक्षणिक, राजकीय उत्थानाकरिता सामाजिक संघटन प्रबळ करण्याकरिता पुढे यावे. उद्योग व्यवसायात उतरुन प्रगतीचे मार्ग शोधावे असे सांगत समाजाची अनुसूचित जमातीची मागणी असल्याने राज्य शासनाव्दारे शिफारस आल्यास विचार केला जाईल असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
Making educational progress, the blacksmith community should turn to industry - Hansraj Ahir

लोहार समाज पोटजाती विकास संस्था, जिल्हा चंद्रपूर च्या वतीने दि. 12 फेब्रुवारी, 2023 रोजी आयोजित विश्वकर्मा जयंती उत्सव तथा विदर्भस्तरीय भव्य वधु-वर परिचय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अहीर म्हणाले की, समाज संघटना हे समाजाचे शक्तीस्थान असते. एकसंध समाज प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याने आज लोहार समाज हळूहळू राष्ट्रीय प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करु लागला आहे. राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा हे या प्रगतीचे द्योतक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार, सुरेश मांडवगडे, डॉ. कामतकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, विजयराव पोहणकर, धनराज धुर्वे, राजु घरोटे, बंडु धोतरे व समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी मान्यवर अतिथीनी समयोचित मार्गदर्शन केले.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment