यवतमाळ : निवडणुकीच्या मैदानात दिग्गजांना ‘बाद’ करणारे महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर कबड्डीच्या मैदानातही तेवढ्या स्फूर्तीने उतरतात. यवतमाळ जिल्ह्याच्यावणी तालुक्यातील साखरा (दरा) येथे सावता माळी बहुउद्देशिय सामाजिक संस्था व ज्योतीबा क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कबड्डीचे प्रेक्षणिय खुले सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वतः खेळाडू असलेल्या खासदार बाळू धानोरकरांना मैदानात उतरण्याचा मोह आवरला नाही. अन् एन्ट्री टाकून ‘कबड्डी.. कबड्डी.. कबड्डी...’ करीत त्यांनी एका क्षणातच एक खेळाडू बाद केला आणि उपस्थितांची वाहवा मिळवली.MP Balu Dhanorkar Show his Kabaddi skills in Kabaddi Tournament
यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, रंगनाथ स्वामी अर्बन निधि बाँक अध्यक्ष संजय खाडे, ग्रा. पं. साखरा सरपंच रजनीताई पिदुरकर, माजी सरपंच रविभाऊ ठाकरे, पोलिस पाटील ज्योत्स्नाताई कोवे, पं.स. वणी सभापती डॉ. मोरश्वर पावडे, जि.कॉ. कमेटी यवतमाळ उपाध्यक्ष पुरुषोत्तम आवारी, वणी ता. कॉ. कमेटी अध्यक्ष प्रमोदभाऊ वासेकर, माजी जि. प. सदस्य मंगल मडावी, से.नि.मुख्याध्यापक मनोहरराव बोरुले, माजी सरपंच मारोती मोहुर्ले, बापुराव ठाकरे, सावता माळी बहु, संस्था साखरा अध्यक्ष जिवन मोहुर्ले, ग्रा. वि. सोसायटी साखरा अध्यक्ष शोक चिने, महादेवराव ठाकरे, से.नि. शिक्षणाधिकारी दिनकररावजी जुमनाके, आकाश महाडोले, अनंता डंभारे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, कबड्डी हा मातीतला खेळ असला तरी येत्या काळात करिअर म्हणून युवकांनी त्याच्याकडे पाहण्याची गरज आहे. या खेळाच्या माध्यमातून येथील युवकांनी राज्याचे तसेच देशाचे प्रतिनिधित्व करीत करून या भागाचे नाव मोठे करावे असे आवाहन देखील त्यांनी युवकांना केले.
0 comments:
Post a Comment