Ads

इंजि. सुभाष कासनगोट्टूवार उत्कृष्ठ नगर सेवक" चंद्रपुर रत्न " पुरस्काराने सन्मानित

चंद्रपुर :भाजपा महानगर जिल्हा महामंत्री व दे. गो. तुकुम प्रभाग क्रमांक १ चे नगर सेवक श्री सुभाष भाऊ कासनगोट्टूवार यांना त्यांचा कामाची व अथक परिश्रमाची पोच पावती चंद्रपूर रत्न पुरस्कार च्या स्वरूपात मिळाली आहे.Subhash Kasangattuwar Awarded "Chandrapur Ratna" Award for Outstanding corporator

एका दैनिक डिजिटल व्हिडिओ न्यूज चॅनल द्वारा आयोजित कार्यक्रमात काल चंद्रपूर चे आमदार श्री किशोर भाऊ जोर्गेवार, राष्ट्रीय मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज भैया अहिर , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक श्री अशोक भाऊ जीवतोडे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेशभाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर प्रेस क्लब चे अध्यक्ष व नवभारत चे जिल्हा प्रतिनिधी श्री संजय तायडे यांच्या हस्ते उत्कृष्ठ नगर सेवक चंद्रपूर रत्न हा पुरस्कार सुभाष कासनगोट्टूवार याना मिळाला.
या कार्यक्रमात विभिन्न क्षेत्रातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पुरुष महिला बालक असे पुरस्कार देण्यात आले परंतु नगरसेवक या गटात एक मात्र पुरस्कार श्री सुभाष कासनगोट्टूवार यांना देण्यात आला. आपल्या प्रभागात यांनी विविध उत्कृष्ट कामे केली आहे, जसे कुंदन प्लाझा हॉटेल ते लॉ कॉलेज रिंग रोड रद्द करण्यासाठी त्यांनी नागरिकांसह मोठे आंदोलन चालवले आणि शेवटी तो प्रस्ताव मंत्रालयातून रद्द करून शेकडो लोकांचे घर वाचवले, तसेच आपल्या प्रभागात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नाव कमवले. तसेच आपल्या प्रभागात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात तीस लक्ष रुपयांचे पारितोषिक कमवले. परवाच चंद्रपूर महानगरपालिका द्वारा आयोजित स्वच्छता लिग स्पर्धेमध्ये ५१ हजार रु. नगदी व दहा लाख रुपये विकास कार्यकरीता बक्षीस जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार ,लोकप्रिय आमदार किशोर्भाऊ जोरगेवार यांचे हस्ते देण्यात आले . योगासाठी महिलांना व वृद्ध नागरिकांना सुख सुविधा उपलब्ध करून दिली , वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सांस्कृतिक सभागृह बांधकाम , प्रभागामध्ये १९गार्डन बांधण्यात आले, श्री स्वामी समर्थ सभागृह बांधण्यात आले,श्री माताजी निर्मला देवी अभ्यासिका व चैतन्य जेष्ठ नागरिक संघाचे सभागृह बांधकाम साठी निधी निधी उपलब्ध करून दिला , गरीब नागरिकांसाठी आरोग्य हेल्थ कार्ड ,बांधकाम कामगार कार्ड ,रेशन कार्ड, श्रमिक कार्ड, आधार कार्ड , आयुष्मान भारत कार्ड, मतदार नोंदणी, मोफत डोळे तपासणी शिबिर , चष्मे वाटप व १११ रुग्णांचे मोतीया बिंदूचे ऑपरेशन करण्यात आले तसेच त्यांच्या ऑफिसात रोज येणारे शेकडो लोकांचे लहान ते मोठे सर्व प्रश्न यशस्वीरिते आणि मनापासून हाताळली. याशिवाय त्यांच्या जनसंपर्क आणि लोकांशी मनमिसळून राहण्याच्या स्वभावामुळे ते सर्वांचे लोकप्रिय आहेत. या सर्व बाबींना लक्षात ठेवून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आपल्या धन्यवाद भाषणात ते म्हणाले की मी शंभर टक्के समाजकारण यात विश्वास ठेवतो.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment