Ads

जिल्ह्यातील ३६ हजार उर्वरित शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ

चंद्रपुर : महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी " छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ " तसेच " महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ " लागु केली. विविध कार्यकारी सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था यांचे कडून अहवाल मागविण्यात आले. मात्र राज्यातील अनेक शेतकरी संस्थांचे यादीत पात्र लाभार्थी शेतकरी असताना त्याना आजपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिल्या गेला नव्हता.
जिल्हा भरात ३६ हजार तर गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील सेवा सहकारी शेतकरी संस्थेचे ९० पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते. तोहोगाव येथील ९० शेतकरी पात्र यादीत असताना सदर शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ न मिळाल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागला. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले होते. एक प्रकारची आर्थिक कोंडी निर्माण झाली होती. तोहोगाव सेवा सहकारी संस्था मर्यादित (र.नं. ९३४) यांनी पात्र शेतकऱ्यां संदर्भातील ठराव पारित करून संबंधितांना पाठविला तरी मागणी ठरावा संदर्भात शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. हि गंभीर बाब निदर्शनास येताच व शेतकऱ्यांची थट्टा होत असल्याचे पाहून जिल्हा महामंत्री भाजपा किसान आघाडी चंद्रपूर चे बंडू गौरकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कर्जमाफी संदर्भात १९/०२/२०२१ रोजी शेतकऱ्यांचा संबंधित मुद्दा उपस्थित करित जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांचेकडे पाठपुरावा केला. मात्र कारवाई च्या अभावाने प्रकरण थंड बस्त्यात पळले. अखेर ना. सुधिर मुनगंटीवार वने, मत्स्यव्यवसाय, सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर, गोंदिया यांना संबंधित शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात पत्रव्यवहार करून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मागणी केली. ना. सुधिर मुनगंटीवार यांच्या मार्फत तत्कालीन मुख्यमंत्री, सहकार मंत्री, प्रधान सचिव यांना पत्रव्यवहार करुन ना. सुधिर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात विधानभवनात आढावा घेण्यात आला. तेव्हा दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ देण्याचे आश्वासन प्रधान सचिवांनी दिले. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पुरवणी मागण्या वरिल चर्चा सत्रात मुद्दा उपस्थित केला गेला. यात उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ देण्याचे मान्य झाले. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ मिळणार असून यासाठी ना. सुधिर मुनगंटीवार यांनी सतत पाठपुरावा करित सरकार पुढे शेतकऱ्यांचा आर्थिक विवंचनेचा विषय लावून धरला आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ मिळवून दिल्याबद्दल सर्व शेतकऱ्याच्या वतीने देवराव भोंगळे व बंडू गौरकर यांनी ना. सुधिर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.36 thousand remaining farmers of the district will get the benefit of loan waiver

तत्कालीन राज्य सरकारने २०१९ मध्ये कर्जमुक्ती योजना लागू केली. मात्र तोहोगाव सेवा सहकारी संस्थेच्या पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. याबाबत बंडू गौरकर यांच्या माध्यमातून देवराव भोंगळे यांच्या सहकार्याने राज्याचे मंत्री सुधिर मुनगंटीवार यांना साकडे घातले. त्यांनी सतत पाठपुरावा करून सदर विषयाला रेटून धरले. त्यांच्या प्रयत्नाने यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून पुढील हंगामासाठी शासकीय दरात कुठल्याही प्रकारचा तुटवळा जाऊ न देता रासायनिक खते, किटकनाशके व अनुदानित ईतर साहित्य उपलब्ध करून द्यावे. हि आम्हा शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कर्जमाफी देण्याची तरतूद केल्याबद्दल मंत्री महोदयांचे आम्ही शेतकरी आभारी आहोत.
किशोर कासनगोटूवार शेतकरी तोहोगाव
तोहोगाव सेवा सहकारी संस्थेचे ९० शेतकरी शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या यादीत पात्र लाभार्थी म्हणून नोंद होती. मात्र प्रदीर्घ काळ लोटला तरी शेतकरी लाभा पासून वंचित राहिले. यामुळे संबंधित शेतकऱ्यानी कर्जमाफीची आशा सोडून दिली होती. बंडू गौरकर व देवराव भोंगळे हे देवदूता सारखे धाऊन आले. सदर विषय जिल्हा पालक मंत्री सुधिर मुनगंटीवार याना माहित करुन दिला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीची तरतूद करुन दिली. मावळलेल्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या असून यामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुधिर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ मिळणार असल्याने त्यांचे आभार.
योगेश खामनकर युवा शेतकरी तोहोगाव
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment