(प्रशांत गेडाम)नागभीड : शेजाऱ्याने बैलबंडी मागितली म्हणून त्याच बंडीच्या उभारीने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी देवपायली येथे घडली. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.As soon as he asked for a bullock-cart, he attacked
सविस्तर वृत्त असे की,लक्ष्मण उरकुडा कोहपरे वय- (75) आणि गणेश पटवार बोरघरे वय- (35) हे दोघे शेजारी आहेत. लक्ष्मण कोहपरे यांना शेतातील माल आणायचा असल्याने त्यांनी शेजारील गणेश बोरघरे यांना बैलबंडीची मागणी केली असता . याचा गणेशला राग आला. त्याने बैलबंडीची उभारी काढून लक्ष्मणच्या डोक्यावर मारली. यात त्यांना चांगलीच दुखापत झाली. असुन तात्काळ त्यांना नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पोलिसांत तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी भादंविच्या कलम नुसार 307, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.
0 comments:
Post a Comment