Ads

बाबुपेठ मधील सिद्धार्थ नगर येथिल नाल्याचा गड्ड्यात बुढून एका 15 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

चंद्रपूर: डॉ. आंबेडकर नगर प्रभागातील बाबुपेठ येथील सिध्दार्थ नगर येथे जंगलातून वाहत येणाऱ्या नाल्याच्या गड्ड्यात पोहण्या करीता गेलेल्या 3 तरुणांपैकी एका 15 वर्षीय सावन हिवरकर या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजता घडली.
Unfortunate death of a 15-year-old youth after getting stuck in the drain of Siddharth Nagar Yethil in Babupeth.
याबाबत येथील लोकांनी आपचे शहर सचिव राजू कूडे यांना याबाबत सूचना दिली असता त्यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुळे साहेब यांना तात्काळ रेस्क्यू टीम सहित घटनास्थळी पोहोचण्याची विनंती केली. त्यानंतर रेस्क्यू टीम च्या माध्यमातून शोधमोहीम सुरू असून 4 तासानंतरही मृतदेह शोधण्यास पोलीस प्रशासनाला यश आले नाही या ठिकाणी याआधी सुद्धा 2 तरुणींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. हा परिसर वनविभागाच्या आणि महानगरपालिकेच्या हद्दीला लागून असून अशी घटना या ठिकाणी घडत असतात. हा नाला 12 ही महिने वाहत असून या ठिकाणी येतील नागरिक कपडे धुण्याकरिता येत असतात, या नाल्याला लागून पुढे स्मशानभूमी असून स्मशानभूमीच्या आणि या नाल्याचे सौंदर्यकरण करण्याकरिता महानगरपालिका कडे आम आदमी पार्टीचा वतीने वारंवार निवेदने देण्यात आली त्यानंतर केवळ वॉलकम्पाऊड करिता फक्त 1 कोटी चे निधी देण्यात आलेली असून मनपा प्रशासनाचे दलित प्रभागाकडे जानीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. हे मनपा प्रशासन दलित विरोधी असल्याचा आरोप आपचे शहर सचिव राजू कूडे यांनी प्रशासनावर केलेला असून मृत्यकांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची विनंती सुद्धा त्यांनी केलेली आहे या वेळेला येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणे गर्दी केलेली असून शोधमोहिम सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment