Ads

चंद्रपुरात आजपासून तीन दिवसीय ग्रामजयंती महोत्सव

चंद्रपूर : आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडीच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जयंतीचे औचित्य साधून चंद्रपुरातील न्यू इंग्लीश हायस्कूलच्या ग्राउंडवर १६ एप्रिलपासून तीन दिवसीय ग्रामजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
A three-day village jubilee festival will be held in Chandrapur from today
रविवारी दुपारी ३ वाजता राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसायमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असून, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. याप्रसंगी डॉ. शिवनाथ कुंभारे, माजी खासदार नरेश पुगलिया, चंदूपाटील मारकवार, रवींद्र भुसारी,भागवताचार्य मनीष महाराज, वैद्य गुरुजी, समाज कल्याण आयुक्त अमोल यावलीकर, नरेंद्र जीवतोडे, वरोराचे माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली आदी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता सामूदायिक प्रार्थना होणार असून, अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा मार्गदर्शन करतील. तर ७ वाजता तुझं गावच नाही का तीर्थ या विषयावर चंदूपाटील मारकवार मार्गदर्शन करणार आहेत. रात्री ८ वाजता खोडे महाराजांचे कीर्तन होणार आहे. सोमवार १७ एप्रिलरोजी सामूदायिक ध्यान, व्यायाम व आरोग्य मार्गदर्शन होणार असून, दुपारी ११ वाजता खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार संजय धोटे गुरुदेव भक्तांशी संवाद साधणार आहेत. दुपारी ३ ते ६ या कालावधीत नैसर्गिक शेतीमधून ग्रामआरोग्य व ग्रामस्वराज्य या विषयावर पद्मश्री कृषीऋषी डॉ. सुभाष पालेकर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ७ वाजता गडचिरोली येथील लेखामेंढाचे देवाजी तोफा यांचे मार्गदर्शन होणार आहे. तर रात्री ८ वाजता कीर्तन होणार आहे. मंगळवारी १८ एप्रिलरोजी रामधून, ग्रामदिंडी शहरातून काढण्यात येणार आहे. यानंतर दिवसभरात डॉ. शरद निंबाळकर, भास्कर पेरेपाटील यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता समारोपीय कार्यक्रम होणार आहे. यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार, सुबोधदादा, खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा, चंद्रपूर मनपाचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment