Ads

उत्कृष्ठ महिला मंच चा अभिनव उपक्रम

चंद्रपुर - उत्कृष्ट महिला मंच चंद्रपुर द्वारा आयोजीत 'जागर स्त्री शक्तीचा सत्कार उत्कृष्ठ जोडीचा' आणी समुह लोक नृत्य स्पर्धेचे आयोजन दि. ३१ मार्च २०१३ रोजी स्थानीक प्रदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात करण्यात आले होते. सामाजीक क्षेत्रात बहुमुल्य योगदान देणारे जोडपे, तथा पारंपरिक समुह लोकनृत्याने खचाखच भरलेल्या प्रेक्षकांना पाय थिरकविण्यास भाग पाडणारे नृत्य, कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
An innovative initiative of Ukstra Mahila Manch
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. डॉ. मंगेश गुलवाडे भाजपा जिल्हाध्यक्ष तर उद्‌घाटक म्हणून श्रीमती अश्विनी मांजे उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग हे लाभले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून लता पो वाढवे पो.नि.,अल्कालाई आत्राम भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष, सुभाष कासनगोट्टूवारमाजी न.से, प्रकाश धारणे कोषाध्यक्ष भाजपा ,ब्रिजभूषन पाझारे, डॉ. प्रेरणा कोलते अध्यक्ष आरूपी फाउंडेशन ,डॉ. प्रसाद पोटदुखे आणी विशेष अतिथी म्हणून मा. स्वप्नील काशीकर ,जिल्हाध्यक्ष वाहतुक युवा सेना,विशाल निंबाळकर अध्यक्ष भाजपा  युवा  मोर्चा ,अरविंद सोनी, नंदुमामा मोगरे ,श्रीमती दुर्गा पोटुर्डे ,दिनेश ज्वेलर्स ,अंकिता  आंबटकर ,प्रज्ञा मदनकर ,राजेंद्र  रघाताटे, दिवाकर पुडतवार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
"Jodi and group folk dance competition captured the hearts of the audience"
 उत्कृष्ट जोडीचा सन्मान प्राप्त   करणाऱ्यांचामध्ये प्रज्ञा नंदराज जीवनकर,सुषमा स्वतंत्रकुमार शुक्ला, उषा टोंगे,स्मीता रेभनकर, परवीन पठान इत्यादिनी विजेते ठरले. तर समुह लोकनृत्यांमध्ये रोख ११००० रु  प्रथम पारितोषीक गृवी गृप डान्स ला,७०००/- रोख लेवल अप ग्रुप डान्स, तृतीय ५००० रु रोख वुमेनीया  ग्रुप डान्स यांना देण्यात आला-आदर्श पुरस्कार प्राप्त श्रीमती अनीता बोबडे तथा गुणवंत संघटक  पुरस्कार प्राप्त बॉडी विवहर ब नरेंद्र भुते यांचा देखील या प्रसंगी सत्कार  करण्यात आला.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व प्रेक्षकांचा प्रचंड प्रतीसाद कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

 संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजना साठी मा. छबुताई वैरागडे अध्यक्ष, उत्कृष्ट महिला मंच तथा माजी न.से. मनपा यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी कार्लेकर, अर्चना  चाहारे, सारिका भुते,पूजा  पडोळे, किरण बल्की, प्रणीता जुमडे  सारिका बोराडे, स्नेहल बांगडे, मनीषा  कन्नमवार , वसुधा बोडखे,वैशाली कन्नमवार,यांनी अथक  परीश्रम  घेतले.
 कार्यक्रमाचे संचालन सौ ऐश्वर्या भालेराव व लोकनृत्य समूह चे मोनिसा  दास यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट महिला मंचच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment