Ads

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कोंढा फाट्यावर वाहतूक विभागाचे वाहनधारकांना मार्गदर्शन.

जावेद शेख तालुका प्रतिनिधी
भद्रावती :अलीकडच्या काळात हायवेवरील वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता हायवे वाहतूक पोलीस विभागातर्फे भद्रावती शहरालगत कोंढा फाट्यावर असलेल्या हायवे वाहतूक पोलीस कार्यालयाजवळ दिनांक 19 रोज बुधवार ला हायवेवरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना वाहतुकी विषयक मार्गदर्शन करण्यात आले. In view of the increasing number of accidents,traffic department guidance to motorists on Kondha Phata.
वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून महामार्ग पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, पोलीस निरीक्षक रवींद्र दुबे,सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र खैरकर , पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलीस हवालदार काशिनाथ निगोत, चंपालाल राजपूत, प्रवीण बोंडे, प्रमोद पिसे, रवींद्र तागडे, प्रशांत देरकर आदी उपस्थित होते. यावेळी चंद्रपूर नागपूर हायवेवरून येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी तथा चारचाकी वाहनधारकांना थांबवून त्यांना पोलीस निरीक्षक रवींद्र दुबे यांनी वाहतुकीबद्दल जनजागृती पर मार्गदर्शन केले . यात बिना हेल्मेट गाडी चालवणेस दारू पिऊन गाडी चालविणे, सीट बेल्ट न लावता गाडी चालविणे, आदी नियमांबद्दल वाहनधारकांना समज देऊन त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे अतिवेगाने वाहने न चालविता ती नियंत्रित वेगातच चालवावी असेही आवाहन करण्यात आले. या काही दिवसात चंद्रपूर नागपूर हायवेवरील भद्रावती व वरोरा तालुक्यात दुचाकी तथा चारचाकी वाहनांचे अपघात झाले .यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक जण जखमी झाले.या रस्त्यावरअपघाताची संख्या शून्य व्हावी या उद्देशाने ही जनजागृती करण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment