चंद्रपूर : तालुक्यातील गौळ (बू) गावात दोन व्यक्तींनी मारहाण केल्यानेच पत्नी नंदा दिलीप गौळकार (४०) हिचा मृत्यू झाला असल्याने पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी पती दिलीप गौळकार यांनी केली आहे.Nanda Gaulkar of Gaul (Bu.) was beaten to death
हि घटना घडून 20 दिवसाचा कालावधी होऊनही आरोपी मोकाट गावात फिरत आहे. पोलिस उलट मृतकाच्या परिवारातील सदस्यांना चौकशीच्या नावाखाली तासनतास पोलिस ठाण्यात बसवून ठेवत असल्याने एकी कडे पत्नीच्या मृत्यूचे दुख सहन करीत असताना दुसरीकडे पोलिसांचा तपासासाठी दिला जात असणारा त्रास हा असहनीय होत असल्याची व्यथा मृतकाचा पती दिलीप गौळकार यांनी मांडली आहे. २५ मार्चला पुंडलीक गौळकार, शुभम गौळकार यांनी पत्नी मंदा दिलीप गौळकार यांनी लाथा बुक्क्यानी मारहाण केली. गावातील नागरिकांनी मध्यस्थी करीत मारहाण थांबविली. यानंतर दि. २९ मार्चला पती शेतात गेला असताना घरुन वहिणीचा फोन आला की पत्नी मंदा घरी बेशुद्ध पडली आहे. पत्नीला शासकीय रुग्णालयात भरती केले. तीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला चंद्रपूर येथे खासगी रुग्णालयात रेफर केले. उपचारादरम्यान तीचा ३१ मार्चला मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू पुंडलीक व शुभम गौळकार यांच्या मारहाणीमुळे झाला असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि मोकाट आरोपींना अटक करून व मला न्याय द्यावा अशी मागणी दिलीप गौळकार यांनी केली आहे.
याप्रकरणी वरोरा पोलिस ठाण्याचे वरोरा पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांना विचारणा केली असता आरोपी विरोधात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे म्हणाले
0 comments:
Post a Comment