भद्रावती तालुका प्रतिनिधी(जावेद शेख):शहरालगतच्या आयुध निर्माण चांदा येथील वसाहतीतील कम्युनिटी हॉल जवळील अय्यप्पा मंदिर मागील भागात वनविभागाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी लाऊन ठेवलेल्या पिंजऱ्यात दि.10एप्रिललासकाडी साडे दहा वाजताच्या सुमारास अखेर बिबट पिंजऱ्यात जेरबंद झाला.या घटनेची माहिती आयुध निर्मानी प्रशासनाने वन विभागाकडे दिली असता सदर बिबट्याला गंदा नाला नर्सरीमध्ये ठेवण्यातआले आहे.A leopard that injured five to seven people is imprisoned in a cage
गेल्या अनेक दिवसांपासून पिपरबोडी व आयुध निर्माणीच्या वसाहतीत धुमाकूळ घालून पाच ते साथ जणांना जखमी केले होते.या घटनेची माहिती आयुध निर्मानी प्रशासनाने वन विभागाकडे दिली असता वनविभागाने आयुध निर्माण वसाहतीच्या अयप्पा मंदिर,स्टेट बँक,हिरा हाऊस सह अन्य पाच परिसरात चार दिवसांपूर्वी अन्य तीन ठिकाणी त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते.या पिंजर्यात ठेवण्यात आलेले आमिष खाण्यासाठी आल्यानंतर तो पिंजर्यात अडकला.
सदर बिबट हा अंदाजे दोन वर्षाचा असून बिबट्याला सध्या वनविभागाच्या गंधा नाला नर्सरीमध्ये ठेवण्यात आले आहे. सदर कारवाई भद्रावती वनविभागातर्फे करण्यात आली.
0 comments:
Post a Comment