भद्रावती तालुका प्रतिनिधी(जावेद शेख):-शेतकरी आपला शेतमाल जिनींग व्यापाऱ्यांकडे नेतो त्यावेळी या व्यापाऱ्यांकडून विवीध माध्यमातुन या शेतकऱ्यांची आर्थिक लुट केल्या जाते.त्यामुळे आधिच हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागते त्यामुळे या व्यापार्यांकडून शेतकऱ्यांची लुट थांबवा अशी मागणी बाळिसाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख नरेश काळे यांनी वरोरा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनातून केली आहेStop looting of farmers' goods by ginning traders.
Shiv Sena taluka chief Naresh Kale's demand.
.शेतकरी आपला शेतमाल घेऊन जिनींगमधे गेल्यास व त्याने मालाची नगदी रक्कम मागीतल्यास ती देतांना शेतकऱ्यांकडून एक टक्का रक्कम कापल्या जाते.त्याचप्रमाणे शेतकरी स्वतः किरायाने गाडी करुन आपला शेतमाल जिनींग व्यापाऱ्यांकडे नेतो.मात्र शेतमालाची गाडी आपल्याकडेच आणावी यासाठी हे व्यापारी गाडिमालकांना प्रलोभन रक्कम देतात व हि रक्कम शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यातून कापली जाते.हि शेतकऱ्यांवर अन्याय करणारी बाब असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.अशा अनेक माध्यमातून शेतमाल विक्रीसाठी आणणार्या शेतकऱ्यांची हे व्यापारी लुट करीत आहेत हि होणारी लुट त्वरीत थांबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन सादर करतांना तालुकाप्रमुख नरेश काळे,विनोद कोळसे,विनोद तळवेकर,ईश्वर ठेंगणे,विकास मडावी,बालू पतरंगे,संजय काळे,विनोद ऊपरे,मधुकर आत्राम आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment