चंद्रपुर :आज दुपारी जाहीर झालेले उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये विसापूरची सोनल दिनकर पोहणे हिने 83 टक्के गुण घेऊन आपल्या कुटुंबाचा सन्मान वाढवला. Overcome adverse conditions, Sonal secured 83 percent marks
आई वडिलांची परिस्थिती अत्यंत नाजूक तरीही आपली मुलगी शिकावी शिकून मोठी अधिकारी बनावी...समजाला सेवा द्यावी या भावनेतून मजुरी करून मुलीला शिक्षण देत आहे. वडील पेपरमिल मध्ये कामाला जातात आणि आई मजुरी करतात अशा प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलीला महागडे शिक्षण देणे म्हणजे तारेवरची कसरतच तरी पण सोनलने या परिस्थितीचा कुठेही बाहू न करता निरंतर अभ्यास व परिस्थितीची जाण ठेऊन मेहनत घेऊन जिद्दीने अभ्यास करून 12 वित 83 टक्के गुण घेऊन आपल्या कुटूंबाचा सन्मान वाढवला त्याबद्दल तिच्या नातेवाईक व मित्र मंडळीं,गुरुजन वर्गाकडून कोतुक होत आहे. विशेषतः तिला चित्रकलेची विशेष आवड असून तिला प्रशासकीय अधिकारी बनायचे आहे.ती FES महाविद्यालय चंद्रपूर येथे शिकत होती तिचे खूप खूप अभिनंदन*
0 comments:
Post a Comment