Ads

आयएमए देशभरात राबविणार 'चलो गाँव की और' उपक्रम

चंद्रपूर : वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने चालू वर्षांत नवीन नवा सामाजिक उपक्रम हाती घेतला असून, गावाकडे चला या उपक्रमाची सुरुवात देशभरात करण्यात आली. एक शाखा एक गाव दत्तक घेऊन त्या गावात नियमित आरोग्य शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरदकुमार अग्रवाल यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित मीट दी प्रेस कार्यक्रमात मंगळवारी दिली.IMA will implement 'Chalo Gaon Ki Aur' initiative across the country
 IMA National President Dr. Sharadkumar Agarwal, 
आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरदकुमार अग्रवाल, महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे मागील काही दिवसांपासून राज्यदौऱ्यावर आहेत. विविध जिल्ह्यात ते भेटी देत आहेत. मंगळवारी ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूर आयएमएने दत्तक घेतलेल्या बेलसनी येथे मंगळवारी आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर डॉ. अग्रवाल आणि डॉ. कुटे यांनी स्थानिक माध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप करीत आयएमच्या कार्याची आणि राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
इंडियन मेडिकल असोसिएशन ही जगातील सर्वात मोठी सामाजिक आणि वैद्यकीय संघटना आहे. तब्बल चार लाखांवर डॉक्टर या संघटनेशी जुळले आहेत. स्वातंत्र्यपूर्वकाळापासून ही संघटना वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती डॉ. अग्रवाल यांनी दिली. कोविड काळात आयएमच्या डॉक्टरांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. कोरोना नियंत्रणात ठेवण्यात येथील डॉक्टरांनी मोठे योगदान दिले असून, जगानेही यासाठी भारताचे येथील डॉक्टरांचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना रुग्णांना जीवनदान देताना दोन हजारावर डॉक्टरांचाही बळी गेला. या सर्व डॉक्टरांच्या कुटुबीयांच्या पाठीशी आयएमए खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. डॉक्टरांवर अलीकडे हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत, अशी खंत व्यक्त करीत सरकारने यासाठी कठोर कायदे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गावाकडे चला उपक्रमांतर्गत गावे दत्तक घेऊन तेथे नियमित आरोग्य शिबिरे घेण्यासह सिकलसेल रुग्णांना नियमित मार्गदर्शन व औषधोपचार करण्यात येणार आहे. डॉक्टरांना थेट ग्रामस्थांशी जोडणे हा यामागील हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला डॉ. अग्रवाल, डॉ. कुटे यांचा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. जयेश लेळे, डॉ. शिवकुमार उत्तुरे, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. संतोष कदम, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. प्रकाश देव, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. अनिल पाचणेकर, डॉ. कीर्ति साने आदींची उपस्थिती होती.
फोटो आहे....
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment