Ads

जिल्हाधिकारी गौडा यांच्या हस्ते जय पेरसापेन बडादेव महागोंगो पुजन संपन्न

चंद्रपूर : तालुक्यातील कोळसा रोड वरील हळदी या गावात जय पेरसापेन बडादेव परमशक्ती परम पुजा (महागोंगो) उत्सव समिती तर्फे सल्लाशक्ती जवळ महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ठिकाणी हळदी सह आजूबाजूच्या गावातील आदिवासी बंधुभगीणी, युवा, विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.Jai Persapen Badadev Mahagongo Pujan performed by Collector Gowda
महापुजेला चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. विनयजी गौडा यांची प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती लाभली. सोबत मंचावर विभागीय अधिकारी श्री. स्वप्निल मरस्कोल्हे, कु. अल्का आत्राम जिल्हाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर, एड. हरीश गेडाम जिल्हाध्यक्ष भाजपा. अनु. जमाती अध्यक्ष ग्रामीण जिल्हा चंद्रपूर श्री. धनराज कोवे जिल्हाध्यक्ष भाजपा अनु.जनजाती मोर्चा महानगर चंद्रपूर, श्री. मनोज आत्राम गोंगपा प्रदेश कार्यवाह म.रा., डॉ. पंकज कुळसंगे सामाजीक कार्यकर्ता, सौ. अंतराताई स. मर्सकोल्हे सचिव मुळनिवासी जय जोहार समिती छत्तीसगढ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ व शॉल देवून कार्यक्रमाचे आयोजक अशोक आलाम व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने करण्यात आले. सदर कार्यक्रमाला जिल्हाधिकारी यांचे आगमन होताच गावातील महिलांनी जिल्हाधिकारी साहेबांचे औक्षवंत करीत तिलक लावुन स्वागत केले व ढोल ताशा सनई, चवघडा या आदिवासी पारंपारीक वाद्याच्या गजरात स्वागत केले. प्रास्ताविक पर संभाषणातून अशोक आलाम यांनी दरवर्षी होत असलेल्या महापुजेची माहिती देऊन गावातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या व वनविभागाच्या समस्या मांडल्या. धनराज कोवे यांनी सांगितले की आदिवासी समाजातील प्रकृती पुजा म्हणजे गोंगोपुजा असते. सदर पुजा सृष्टीतील जीवजंतु, नदी नाले, निसर्ग संपदा जल, जंगलातील पशुपक्षी प्राणी यांच्ये जतन वृद्धी व गावातील सर्वाना सुख समृद्धी व शांती मिळण्यासाठी केलेली पुजा असते. तसेच कु. अल्का आत्राम यांनी सांगितले की, समाजातील महिला- पुरुष, युवा-युवती, विद्यार्थी यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वताचा विकास साधावा. मनोज आत्राम यांनी समाजीक एकता व अखंडता होणे जरुरी असल्याचे सांगितले. मा. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आदिवासी समाज नेहमी प्रकृती पुजक असल्यामुळे विविधता अबाधीत असल्योच बोलुन दाखवित जंगलाचे खरे स्वरंक्षण तुम्ही करत आहात. मात्र जंगलावर आधारित काही रोजगार करणे गरजेचे आहे. त्या साठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याबाबत सांगितले. तसेच आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर देऊन डॉक्टर, इंजिनिअर, कलेक्टर अशा मोठ्या पदावर येण्यासाठी प्रयत्न करावे असे बोलून दाखविले. पुढे बोलतांना सांगितले की, मला प्राकृतीक पुजेचा सन्मान दिला. त्याचा मला आनंद आहे. सर्वाचा विकास म्हणजे देशाचा विकास होतो. डोंगर दऱ्या, कपाऱ्या व जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या शेवटच्या मानसाचा विकास करण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे तेव्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र समाजातील सुज्ञ व जागृक नागरीकांना समाजापर्यंत माहीती पोहचविणे गरजेचे असल्याबाबत बोलत होते. तेव्हा रवींद्र कुळमेथे, रजनिकांत आलाम ग्रामपंचायत सदस्य, मनोहर नैताम ग्रामपंचयत सदस्य, भुमक मांदि विशाल कुमरे, निखिल गेडाम, पोर्णिमा गेडाम, बबन कुळमेथे, श्रिनिवास तोडासे, कपिल कुमरे, अजय पेंदोर, लहुजी आलाम, एकनाथ आलाम, शिलाताई आत्राम, रतन आलाम, व डायमंड क्लब हळदी, राणा प्रताप संघ पिंपळखुट सर्व युवा अध्यक्ष व सदस्य गण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन धनराज कोवे यांनी केले. तर आभार अशोक आलाम यांनी मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment