Ads

वृद्धाश्रमातील 40 वृद्धांना घडविले भद्रावती पर्यटन.

भद्रावती जावेद शेख :-काही वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू पावलेल्या आपल्या मुलाच्या स्मृतिदिनी शहरातील महेंद्र गावंडे यांनी विसापूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना ऐतिहासिक भद्रावती नगरीचे पर्यटन घडवून आपल्या मुलाला अनोखी असे अभिवादन केले. त्यांचा हा उपक्रम शहरात अविस्मरणीय ठरला आहे.
Bhadravati tourism was organized for 40 elderly people in the old age home.
महिंद्रा गावंडे यांच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता.त्याच्या स्मृतिदिनी गावंडे परिवार काही ना काही सामाजिक उपक्रम राबवित असते. यावेळी त्यांनी मुलाच्या स्मृतिदिनी जिल्ह्यातील बल्लारपूर जवळील विसापूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील चाळीस पुरुष व महिला वृद्धांना सुप्रसिद्ध ऐतिहासिक भद्रावती नगरीचे दर्शन घडविले. यावेळी भद्रावती शहराचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी येथील गवराळा मंदिर परिसरात या वृद्धांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. या सर्व वृद्धांनी शहरातील ऐतिहासिक जैन मंदिर,भद्रनाग मंदिर, गवराळा येथील वरदविनायक मंदिर, विंजासन येथील ऐतिहासिक बुद्ध लेणी व इतर शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या व या सर्व तीर्थांचे दर्शन घेतले. या पर्यटनामुळे वृद्धांच्या एकांगी जीवनात काही काळ आनंदाचे वातावरण पसरले. या पर्यटनादरम्यान या सर्व वृद्धांची गावंडे परिवारातर्फे भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. गावंडे परिवाराच्या या उपक्रमाचे सर्व वृद्धांनी यावेळी आभार मानले.यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर,काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, रश्मी गावंडे ,महेंद्र गावंडे, शीतल गावंडे, उपाध्यक्ष संतोष आमने, विवेक आकोजवार,ड्रा माला प्रेमचंद,युअराजधानोरकर, किशोर खंडाळकर सुनिता खंडाळकर उपाध्यक्ष संतोष आ मने पिंपळकर ,आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment