Ads

वाघाच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू.

भद्रावती जावेद शेख :
उन्हाळ्याच्या दिवसात वाघाचा धुमाकूळ कमी झाल्याचे वाटत असतानाच मांगली परिसरात पट्टेदार वाघाने Tiger पुन्हा एकदा डोके वर काढले असून एका पट्टेदार वाघाने एका गाईला ठार मारल्याची घटना तालुक्यातील मांगली शेत शिवारात दिनांक 13 रोज मंगळवारला दुपारच्या वेळेस घडली.
Cow dies in tiger attack.
मांगली परिसरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या मागील परिसरातील एका शेतशिवारात पाळीव जनावरे दुपारच्या वेळेस चरत असताना दबा धरून बसलेल्या एका पट्टेदार वाघाने चरत असलेल्या गाईवर हल्ला केला. ही घटना लगतच्या शेतात काम करीत असलेल्या महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्याने वाघाने तेथून पळ काढला.मात्र या हल्ल्यात सदर गाईचा मृत्यू झाला.सदर गाय ही मांगली येथील गजानन उताणे यांच्या मालकीची असून तिची अंदाजे किंमत वीस ते पंचवीस हजार असल्याचे समजते. सदर घटनेची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्राला कळविण्यात आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक ती कार्यवाही केली. सदर गाईच्या मालकाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मांगली येथील गावकरी करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment