Ads

दहावीच्या निकालात आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी.

राजुरा :नुकताच जाहिर झालेल्या इयत्ता दहावी बोर्डाच्या निकालात आदर्श हायस्कुल राजुराच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करीत बाजी मारली असून उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा आदर्श शाळेने कायम राखली आहे.
Excellent performance of Adarsh ​​School students in10th results.
कु. कस्तुरी रवींद्र बेले ने 89. 60 % गुणप्राप्त करीत आदर्श हायस्कुल मधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु. श्रुती योगेश रायपुरे ने 85.20% गुण मिळवून द्वितीय तर कु. वेदांती परशुराम गर्गेलवार ने 84.80 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. कु. संचिता तिरुपती जंपलवार 84.40 % व यश नरेंद्र येरणे ने 80.40% गुण घेऊन अनुक्रमे चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकाविला. शैक्षणिक सत्र सन २०२२ - २०२३ या वर्षी इयत्ता दहावी च्या परिक्षेसाठी एकूण 90 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यातून 14 विद्यार्थी गुणवत्ता यादीत , 32 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 31 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा एकूण निकाल 97.77% इतका लागला आहे. शैक्षणिक गुणवत्ते सोबतच विविध उपक्रमात विध्यार्थी सहभाग घेऊन त्यांची सर्वांगीन प्रगती करिता या शाळेतील शिक्षक अथक परीश्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वृंदांचे माजी आमदार तथा संचालक बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा चे ऍड. संजय धोटे, संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबनानी, सचिव भास्करराव येसेकर, सहसचिव शंकरराव काकड़े, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकीवार, संचालक लक्ष्मणराव खडसे, मधुकर जाणवे, अविनाश निवलकर, मंगला माकोडे , आदर्श हायस्कुल शाळेचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर , आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा छ. शिवाजी महाराज स्काऊट युनिट लीडर बादल बेले, वर्गशिक्षक नवनाथ बुटले, वर्गाशिक्षिका मेघा वाढई यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी अभिनंदन केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment