Ads

आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत वेधले गोंडवाना विद्यापीठातील समस्यांकडे लक्ष

चंद्रपुर :आज मंगळवारी आमदार आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथील राजभवानात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत गोंडवाना विद्यापीठातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले असुन या समस्या प्राथमिकतेने सोडविण्यात यावा अशी मागणी केली आहे.MLA Kishore Jorgewar met Governor Ramesh Bais and drew attention to the problems of Gondwana University
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी गोंडवाना हे वेगळे विद्यापीठ निर्मीती करण्यात आले. परंतु विद्यापीठ स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांच्या व प्रशासनाच्या दृष्टीने येथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. गोंडवाना विद्यापीठाचे शैक्षणिक मुल्यांकन लक्षात घेता येथील विद्यार्थ्यांना खाजगी कंपनी मध्ये नोकरी मिळत नाही. यामुळे चंद्रपूर-गडचिरोली येथील विद्यार्थी शिक्षणसाठी उच्च मुल्यांकन असलेल्या मुंबई-पुणे येथील विद्यापीठात स्थलांतरीत झाले आहे. तसेच विद्यापीठात व्यावसायाभिमुख अभ्यासक्रम नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना करियर घडवितांना अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे विद्यापीठ परीक्षा पद्धतीत योग्य सुधारणा करून गुणवत्तीय दर्जा वाढविण्यासाठी त्रिस्तरीय मुल्यांकन पद्धतीचे अवलंबन करण्यात यावे, मागील अनेक वर्षापासून विद्यापीठातील प्राध्यापकांची पदे रिक्त आहे.परिणामी नक्षलप्रभावित व सुदूर क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या उत्तम व दर्जेदार शिक्षणावर विपरीत परिणाम पडत आहे. त्यामुळे तातडीने सदर रिक्त असलेले सर्व पदे भरण्यात यावी, विद्यापीठ स्तरावरील क्रीडा स्पर्धेत विद्यार्थिंनीनकरिता महिला व्यवस्थापक व प्रशिक्षक पाठविण्यात यावे, अनुतीर्ण झालेल्या विषयाचेच परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारण्यात यावे, राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी ची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी कॅम्पस प्लेसमेंट ची व्यवस्था करण्यात यावी, गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपूर येथे सुरु करण्यात यावे, विद्यापीठातर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे उपकेंद्र चंद्रपूर येथे सुरु करण्यात यावे आदी मागण्या यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना सदर भेटी दरम्याण केल्या असुन सदर मागणीचे निवेदनही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल यांना दिले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment