Ads

विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीकडून खोटे धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक

चंद्रपूर :-वरोरा तालुक्यातील बोडखा (मोकाशी) येथील शेतकन्याची वाळली हळद खरेदी करून खोटे धनादेश दिले व त्यांची आर्थिक फसवणूक केली त्यामुळे विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे वर फौजदारी गुन्हा करा व सर्व शेतकऱ्याच्या हळद या मालाची उर्वरित रक्कम मिळवून देऊन शेतकन्याची फसवणूक करणाऱ्या विदर्भ एग्रो सोल्यूशन कंपनीचे नोंदणी ( लायसन्स) रद्द करा अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. यावेळी पिडीत शेतकऱ्यांसह जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष अमोल बावणे व मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे उपस्थित होते. Fraud of farmers by fake checks from Vidarbha Agro Solution Company
बोडखा या गावांतील जवळपास 35 शेतकऱ्यांच्या शेतात पिकणारी वाळलेली हळद दिनांक १२/०४/२०२२ ला योग्य भाव ठरवून व वजन करून वाळलेली हळद कंपनीने घेतली व अॅडव्हान्स म्हणुन प्रत्येकी ५०,०००/- ( पन्नास हजार) आर. टी. जि. एस. व्दारे दिले. उर्वरीत रक्कमेचे धनादेश दिले मात्र ते धनादेश शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात ४५ दिवसांनी लावले असता कंपनी संचालकांच्या बैंक खात्यात कोणतीही रक्कम नसल्यामुळे दोनदा चेक बॉन्स झाले, दरम्यान विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे यांच्याकडे शेतकरी भेटीला गेले असता व वारंवार त्यांना विनंती केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन शेतकऱ्यांना कार्यालयातून हाकलून दिले.

कंपनी संचालकांना माहीत होते की बँकेत चेक वाटविल्या जाणार नाही. तरी सुद्धा जाणून बुजून व त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, दरम्यान एक वर्ष लोटून सुध्दा मालाची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी शेतीचे हंगामात शेतीची मशागत कशी करावी व शेतात पेरणी कशी करावी. हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जर शेतात माल न पेरल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, प्रसंगी ते आत्महत्या सुद्धा करू शकतात त्यामुळे पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आरोपी विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीचे संचालक प्रकाश लोखंडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून शेतकऱ्यांचे उर्वरित पैसे परत मिळवून द्यावे अन्यथा शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्या केल्यास शासन व पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष अँड अमोल बावणे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, बोंडखां गावाचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मेश्राम यांच्यासह पिडीत शेतकरी विलास तुराळे, पुनेश्वर तुराळे, उत्तम तुराळे, प्रल्हाद मेश्राम, देविदास हुलके, किसना चिडे यांनी दिला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment