Ads

बळीराजाची फसगत खपवून घेणार नाही : रविंद्र शिंदे

भद्रावती तालुका प्रतिनिधी:
शेती हा ग्रामीण जीवनाचा आधार आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला असून यावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. त्यामुळे बी-बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये, त्यांना योग्य उगवण क्षमतेची व पिकांवर रोगांचा तथा कीटकांचा प्रादुर्भाव होवू नये, अशीच बियाणे उपलब्ध करून द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांची फसगत झाल्यास ते कदापी खपवून घेतल्या जाणार नाही, असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा - भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी दिलेला आहे.Will not tolerate Farmer's deception: Ravindra Shinde
सध्या पावसाळ्याच्या तोंडावर बळीराजाची पेरणीच्या कामांसाठी लगबग सुरू झाली आहे. कृषी केंद्रातून बियाणे, खते व पेरणी साठी लागणारे साहित्य शेतकरी खरेदी करीत आहे. दरवर्षी काही शेतकऱ्यांना असे अनुभव येतात की खरेदी केलेले बियाणे हे उगवतच नाही. किंवा बोंडअळी प्रतिकारक्षम नसल्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव करणारे परराज्यातील आरआरबीटी किंवा चोरबीटी नावाने प्रचलित असलेल्या कपाशीची लागवडीसाठी बंदी असतानाही शेतात लागवड होते. यासाठी कृषी केंद्र चालक जवाबदार आहेत. त्यांनी असे उगवण क्षमता नसलेले तथा बंदी असलेले परराज्यातील आरआरबीटी किंवा चोरबीटीची कृषी केंद्रातून विक्री करू नये व शेतकऱ्यांची फसगत करू नये, असे आवाहन रविंद्र शिंदे तथा अन्नदाता एकता मंचचे अनुप खुटेमाटे यांनी केले आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बंदी असलेल्या चोरबिटीचा साठा दाखल झाला आहे. परराज्यातून बाजारात अनधिकृतपणे आरआरबीटी किंवा चोर बीटी नावाने प्रचलित असलेल्या कपाशीला या लागवडीसाठी बंदी आहे. ही बीटी कपाशी बोंडआळी प्रतिकारक्षम नसल्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. छुप्या मार्गाने अनेक ठिकाणांहून आरआरबीटी किंवा चोर बीटीची विक्री सुरू आहे. कृषी विभागाच्या पथकाने अशा काही कृषी केंद्रावर कारवाई देखील केली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी या अनधिकृत बीटीची लागवड करु नये, व कृषी केंद्र चालकाने कृषी केंद्रात असे बियाणे ठेवू नये, कृषी विभागाने जिल्ह्यातील कृषी केंद्रांची झडती घ्यावी व पाळत ठेवावी, असे जाहीर आवाहन रविंद्र शिंदे तथा अन्नदाता एकता मंचचे अनुप खुटेमाटे यांनी केले आहे. अन्यथा शेतकऱ्यांची फसगत झाल्यास ते खपवून घेतल्या जाणार नसल्याचेही रविंद्र शिंदे म्हणाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment