Ads

अखेर22 तासानंतर मिळाले घोडझरी तलावात बुडालेल्या चार युवकांचा मृतदेह...

वरोरा शेगाव (बु,)जावेद शेख :-नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात रविवारला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान चार युवक तलावात मोबाईलवर सेल्फी काढत असतांनाच एक युवक पाय घसरून पडला, त्याच्या पाठोपाठ त्याला वाचवण्यासाठी तिन मित्रांनी तलावात उडी घेतली. त्यात या चारही युवकांचा बुडुन मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली.Finally, after 22 hours, the bodies of four youths who drowned in Ghodazari lake were found...
क्षणात या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली.नागभीड पोलीसांना याघटनेची माहिती देण्यात आली...
पोलिस घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम राबविण्यात आली होती सायंकाळ झाल्याने त्यांच्या मृतदेहाचा थांगपत्ता लागला नाही जिल्हा अधिकारी यांना या घटनेची माहिती देण्यात आली त्यांनी लगेच आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण चमुला रविवारलाच रात्री घोडाझरी येथे पाठविले असता चमुने सोमवारी सकाळी ६ वाजता पासून आपली शोध मोहीम सुरू केली तब्बल 22 तासांनी संकेत प्रशांत मोडक (२२) चेतन मांदाळे (१७) धीरज झाडे(२७) मनिष श्रीरामे (३०) त्यांचे मृतदेह सापडले असून चारही मृतदेह नागभीड येथिल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले व त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.त्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले,नागभीड पोलिस यांनी अखेर सर्व युवकांचे मृतदेह मिळविण्यात करिता अथक परिश्रम घेऊन मृतदेह प्राप्त केले.. सर्व माहिती शेगाव वासियांना मिळताच गावात तसेच परिसरात हंबरडा सुरू असून गावात सर्वत्र शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यांच्या मृतदेहावर शेगाव येथील स्मशान भूमीत येथे रात्री अंतिम संस्कार करण्यात येईल.....
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment