(वरोरा)चंद्रपूर - नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रत्नमाला चौकातील उड्डाण पुलावरील प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्या अशी मागणी एका निवेदनाद्वारे वरोरा भाजपा युवा मोर्चाच्या नेतृत्त्वात शुभम चांभारे सह कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी न .प वरोरा यांच्याकडेआज दि.१७ जुलै २०२३रोजी केली
यावेळी दिलीप घोरपडे , शुभम चांभारे,संजू राम परशुराम मरस्कोल्हे, अक्षय भिवदरे ,अभय मडावी ,आकाश भागडे ,अभिजीत गयनेवार ,महेश श्रीरंग , शिरीष डहाके, खुशाल बावणे, राहुल बांदुरकर यांची उपस्थिती होती
चंद्रपूर - नागपूर राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या रत्नमाला चौकातील उड्डाण पुलावरील प्रवेशद्वाराला सातत्याने पक्षाचे राजकीय, सामाजिक, धार्मिक, फलक लावल्या जातात त्यामुळे दिशादर्शक फलकाचा उपयोग होत नाही या प्रवेशद्वारावर कुठल्याच राजकीय , सामाजिक ,धार्मिक फलक लावण्यास निर्बंध लावण्यात यावे यापुढे आढळल्यास फलक लावण्यावर शासकीय दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा निवेदनाद्वारे करण्यात आली आहे , सदर पुलावरील प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नाव देण्यात यावे अशी मागणी ना. नितीन गडकरी ,(रस्ते परिवहन राजमार्ग व जहाज मंत्री भारत सरकार )ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार ( वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय म.रा तसेच पालकमंत्री ,चंद्रपूर- गोंदिया जिल्हा)
विनय गौडा (जिल्हाधिकारी चंद्रपूर )उपविभागीय अधिकारी मॅडम वरोरा , सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग वरोरा यांच्याकडे सुद्धा केली आहे
0 comments:
Post a Comment