Ads

शेतकऱ्यांनी तारखेची वाट न पहाता पिकविमा करावा

चंद्रपुर :-जिल्ह्यातील पीक क्षेत्रामध्ये धान, सोयाबीन, कापूस, तूर असे खरिपाची विविध पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळण्यासाठी शासनाने केवळ एक रुपयात पिकविमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवित आहे.त्याची अंतिम मुद्दत ३१ जुलै असून अजूनपर्यंत शेतकरी सेतू केंद्र,ग्रामपंचायत व कृषी सहाय्यकाकडे सातबारा घेऊन पोहचले नसल्याचे दिसून येत आहे.
Farmers should take crop insurance without waiting for the date
शेतकऱ्यांना सातबारा काढण्यासाठीही सेतू केंद्राला पैसे मोजण्याची गरज नाही त्यासाठी शासनाकडून सेतुकेंद्राला प्रति सातबारा ४० रुपये अदा केल्या जात आहेत.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुद्दतीची प्रतीक्षा न करता पीक विमा त्वरित काढण्याचे आवाहन ना.सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शनात देवराव भोंगळे यांचे सूचनेनुसार बंडू गौरकार किसान आघाडी चंद्रपूर जिल्हा महामंत्री यांचे कडून करण्यात आले आहे.
या योजनेमध्ये संपूर्ण अधिसूचित पिकाखालील क्षेत्राय क्षेत्राचा विमा काढून घेण्यासाठी कृषि विभाग, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक गावो- गावी प्रचार प्रसिद्धी करत आहेत. तसेच आपले सेतू, केंद्र सेतू, बैक, ग्रामपंचायत मध्ये जाऊन येत असलेल्या अडचणी चे निराकरण करत आहेत. एक रुपयात सोयाबीन- ५२ हजार ७५०रु प्रति हेक्टरी, कापूस - ५५ हजार ७५०रु प्रति हेन्टरी, तूर - ३६ हजार ८०२ रू प्रति हेक्टरी, आणि धान ४७ हजार ७५० रु प्रति हेक्टरी एक रुपयाच्या पिकविमा मुळे पिकांना सुरक्षा कवच मिळणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी अंतिम तारखेची वाट न बघता लवकरात लवकर आपल्या शेतातील पिकाचा पिक विमा उतरवून घ्यावा असे देवराव भोंगळे व किसन आघाडीचे जिल्हा महामंत्री बंडू गौरकार यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे तसेच जिल्हा कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment