Ads

स्वच्छता पंधरवाडा, सप्ताह निमित्त पेट्रोलियम गँस मंत्रालय भारत सरकार तर्फे अंध विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

तालुका प्रतिनिधी जावेद शेख :- पेट्रोलियम एवं प्राकृतिक गँस मंत्रालय भारत सरकारच्या वतीने 'स्वच्छता पंधरवाडा सप्ताह''Cleanliness Fortnight Week ' निमित्त आनंद अंध विद्यालय, आनंदवन येथील दृष्टीबाधित अंध विद्यार्थ्यांना शालेय टिपीन बाँक्स साहित्याचे वाटप करण्यात आले.
अभय रायकवार, सिनिअर सेल्स मँनेजर भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड भारत सरकार नागपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून तर मनोज भगत कस्टमर केअर आँफिसर, प्रणेश मालू एम.जे. मालू पेट्रोलियम उद्योजक वरोरा, तसेच देवानंदजी महाजन सरपंच माढेळी ओम साई पेट्रोलियम उद्योजक, आनंदवनाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. रूपाली दरेकर, राहुल परचाके, सेल्स ऐक्जूकेटिव्ह आँफिसर मा.स्वप्नील फटींग, अक्षय सोरते, अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक सेवकराम बांगडकर, व पालक मंडळींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या स्वच्छता पंधरवाडा सप्ताह निमित्त अंध विद्यालयाच्या परिसरात अंध विद्यार्थ्यांनी बुक बँलेन्स, बाँस्केट बाँल, संगीत खुर्ची व बुध्दीबळ अशा विविध स्पर्धेत सहभागी होवून स्वच्छतेबद्दल जनजागृती केली. अभय रायकवार यांनी अंध विद्यार्थ्यांच्या कला कौशल्य बघून ते भारावून गेले व म्हणाले कोणत्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक द्यायचा व कोणत्या विद्यार्थ्यांला प्रोत्साहनपर बक्षिस द्यायचे हे मला सुचूनच राहिले नाही म्हणून मी सर्वच अंध विद्यार्थ्यांना बक्षिसे देतोय असे म्हणताच अंध विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. परमानंद तिराणिक कलाशिक्षक यांनी पाहुण्यांना अंध शाळेबद्दल माहिती देवून या अंध विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आपण स्वत अशा विविध उपक्रमाच्या निमित्ताने या अंध मुलांचा आवाज समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा अशी मान्यवरांना विनंती केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृष्णा डोंगरवार, तनुजा सव्वाशेरे, वर्षा उईके, विलास कावणपूरे या शिक्षक मंडळींनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन परमानंद तिराणिक कलाशिक्षक यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपीय प्रसंगी सर्व अंध विद्यार्थ्यांना व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना खावु देण्यात आला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment