भद्रावती तालुका प्रतिनिधी :१२ जुलै ला एक युवक अर्धनग्न अवस्थेत भद्रावती तालुक्यातील घोणाड फाटा येथे दिसला,त्यांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.रोजगाराच्या शोधात आलेल्या युवकाची अज्ञाताने लुटले आणि त्यांच्या जवळ असलेले पैसे आणि मोबाईल घेऊन त्यांचे कपडे फाडून पसार झाला.असे झाल्यामुळे तू युवक घोनाड आणि मुरसा परिसरात ५ दिवस भटकत होता.Amol Kshirsagar became an angel for the youth of Raigad.
जिथे पाणी मिळाले ते पाणी पित होता.पण अर्धनग्न अवस्थेत असल्यामुळे गावकरी मारतील या भीतीने हा युवक ५ दिवस उपशीच होता.तो उपाशी असल्यामुळे पूर्णपणे अशक्त झाला होता आणि उभा झाला की जमिनीवर पडत होता,पाऊस सुरू असल्यामुळे थंडीने कुडकुडत होता.अश्या अवस्थेत शिवशक्ती नैसर्गीक दूध डेअरी यांच्या दूध वाहनाने आकाश कुटेमाटे आणि मारोती ठोंबरे यांच्या साहाय्याने त्यांना चंद्रपूर येथे आणण्यात आले आणि ही माहिती मिळताच श्री दिलीप मत्ते यांनी कपडे उपलब्ध करून दिले.तसेच दूध पिण्यासाठी दिले आणि उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करून त्यांच्या कुटुंबाला माहिती दिली असता.त्यांना संपर्क साधला असता आजी आणि छोटा भाऊ असल्याचे समजले.त्यांनी त्यांचा नाव विक्की तुकाराम पवार गाव सनकवाडी तालुका माणगाव जिल्हा रायगड येथील असल्याचं सांगितलं.आपला नातू सापडल्या असल्याचं कळताच आजी ढसाढस रडली आणि माझ्या नाताला गावाला पोहचण्याची विनंती श्री अमोल क्षीरसागर अध्यक्ष तंटा मुक्त समिती पिपरी यांच्याकडे केली.डॉक्टरांनी त्यांना आणखी काही तास उशीर झाला असता तर जीव गेला असता असे सांगितले. त्यांच्यावर उपचार पूर्ण झाल्यानंतर तेथील पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना विदर्भ एक्स्प्रेसने त्यांना 16 जुलै रोजी 4 वाजता पुणे येथे पाठवले.त्यासाठी शिवशक्ती नैसर्गीक दूध डेअरी आणि अन्नदाता एकता मंच चंद्रपूर यांनी तिकीटचा खर्च केला असता त्यांच्या कुटुंबांनी तो खर्च परत करणार असल्याचं सांगितलं.१७ जुलै ला तो त्यांच्या भावासोबत पुणेला असल्याचं त्यांनी अमोल क्षीरसागर यांना कळवल.यासाठी पोलिस प्रशासन,डॉक्टर आणि विदर्भ एक्स्प्रेसने ट्रॅव्हल्स यांनी सहकार्य केल्याचे श्री अमोल क्षीरसागर यांनी सांगितले.
Good work
ReplyDelete