Ads

पेन्शनचे पैसे दिले नाही म्हणून बापाला मुलाकडून जीवे मारण्याचा प्रयत्न.

भद्रावती तालुका प्रतिनिधी: बापाने आपल्या पेन्शन मधील पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात मुलाने आपल्या बापाला मोगरी व दगडाच्या सहाय्याने जीवनाशी मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भद्रावती शहरातील अहिल्यादेवी नगर येथे दिनांक 1रोज शनिवारला घडली. या घटनेत बाफ गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी प्रथम शहरातील ग्रामीण रुग्णालयात व नंतर चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी सुरज गुलाब दाते याला अटक केली आहे.
Attempt to kill father by son for non-payment of pension Money.
गुलाब लक्ष्मण दाते वय 72 वर्षे हे शहरातील अहिल्यादेवी नगरात राहतात. त्यांचा मुलगा सुरज दाते हा त्यांना नेहमी पेन्शनचे पैसे मागायचा मात्र त्याचे वडील गुलाब दाते हे त्याला पेन्शनचे पैसे देण्यास नकार देत होते. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. घटनेच्या दिवशी आरोपी सुरज दाते याने आपले वडील गुलाब दाते यांना पेन्शनचे पैसे मागितले असता त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर गुलाब दाते हे झोपून असताना मुलगा सुरज याने लाकडी मोगरी व दगडाच्या साह्याने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्रथम शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी सुरज दिते याला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment