Ads

सफाई कामगारांना कपडे वाटप करून वाढदिवस साजरा

चंद्रपुर :असे म्हणतात की प्रेमाला कृतीची जोड आवश्यक असते.ती जोड मिळाली की संबंध आणखी दृढ होतात.असाच काहीसा अनुभव येथील छबु वैरागडे या नगरसेविकेला आला.कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या ताईचा वाढदिवस विद्यार्थ्यांना नोटबुक व सफाई कामगारांना कपडे वाटप करून साजरा केला.आणि हा विषय चर्चेचा ठरला.Celebrate birthday by distributing clothes to cleaners*
उत्कृष्ट महिला मंच, रामनगर जलमंदिर गार्डन ग्रुप,आझाद गार्डन सूर्यनमस्कार ग्रुपने माजी नगरसेविका, उत्कृष्ट महिला मंच अध्यक्षा, भाजपा महानगर जिल्हा उपाध्यक्ष, चंद्रपूर आपला तेली समाज संघ महाराष्ट्र शहर अध्यक्ष छबु वैरागडे यांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प करीत, वाढदिवसाच्या दिवशी, सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक मनपा शाळा , रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा येथील गरजू विद्यार्थ्यांना नोट बुक वाटप केले तर मनपा सफाई कामगार कर्मचारी यांना कपडे वाटप केले.सामान्यतः या कामगारांची कुणी दखल घेत नाही.कपडे भेट मिळाल्याने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनपा शिक्षणाधिकारी नागेश नित, साक्षी कार्लेकर, मुख्याध्यापिका वर्षा आंबटकर,रजनी पोटदुखे,प्रभा बेले,आरिफा मॅडम यांची उपस्थिती होती. आभार रजनी पोटदुखे यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी मनीषा कन्नमवार,सारिका भुते, पूजा पडोळे,प्रणिता जुमडे,अर्चना चहारे, वैशाली कन्नमवार,संगीता बोरीकर,लता साखरकर, स्नेहा काळे,सरिता घट्टे, रोहिणी घट्टे,प्रियंका चीताडे,निलिमा रघाताते, संगीता पराते, प्राजक्ता बावणे,जयश्री साखरकर, सुनीता उरकुडे, माधुरी पिपळकर,सविता ठोबरे, माया बरडे,कांचन बरडे शिल्पा रहाटे,रजनी जेणेकर,प्रविना जेनेकर, मेघा बरडे,शिल्पा रहाटे, खुटेमाटे,निलिमा ठोबरे, शालू रहाटे,मनीषा जोशी,विद्या रोडे,संध्या रोडे, माधुरी बरडे,कल्पना जेणेकर यांनी परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment