चंद्रपूर : मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची बलात्कार आणि हत्या करण्यात आल्याची घटना समाजमध्यमातून समोर आली आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असून
आत्तापर्यंत १४० लोकांनी आपला जीव गमावला आहे. Babupethkar's public outcry against Violence against women in Manipur, killings and Durgapur desecration of Dr.Babasaheb Ambedkar's image
जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही तेथील राज्यातील भाजप सरकार परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकले नाही, मनिपुर मधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर बाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, पंतप्रधान सर्व जग फिरता आहेत परंतु मणिपूरला गेले नाहीत हा असंवेदनशीलपणा पंतप्रधानाला शोभत नाही, मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे, भाजपाने देशात भीतीचे वातावरण तयार केले आहे,
अशा सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही त्यामुळे पंतप्रधान नरेन्द्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महिला बाल कल्याण मंत्री स्मृती ईराणी तसेच मणिपूर चे मुख्यमंत्री यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
तसेच चंद्रपूर मधील दुर्गापूर येथे एका मद्य विक्रेत्याने आपल्या दुकानातील शौचालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून संपुर्ण देशवासीयांची भावना दुःखवण्याचे काम केल्याने अश्या विकृत मानसिकतेला ठेचण्याची गरज आहे.
दोन्ही प्रकरणे गंभीर असल्याने आज बाबुपेठ चा जनतेकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्या जवळून नेताजी चौक ते जूनोना चौक ते आंबेडकर चौक असे पैदल मार्च करून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेऊन या दोन्ही घटने विषयी सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच या दोन्ही प्रकरणाची शासनाने चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी. अशी मागणी बाबुपेठ चा जनतेकडून करण्यात आली.
यावेळेस चंदाताई वैरागडे त्यांची टीम रणरागिणी महिला मंडळ, राजु कुडे, विनोद लभाने, शशिकांत मेश्राम, हनुमान चौखे, अनुप तेलतुंबडे, महेश वासलवार, शैलेश जुमडे, महेश म्याकलवार, अशोक अंबागडे, उमंग हिवरे, गुंजन येरमे, जयदेव देवगडे, भिमराज बगेसर, रहेमान पठाण, पुष्पाताई मून, पल्लवी खोब्रागडे, विशाखा मेश्राम, चारूशिला बारसागडे, प्रिती लभाने, अनिता चौखे, नम्रता रायपुरे, निशा गेडाम, भारती कुडे, महानंदाताई वाळके इत्यादी महिला सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment