Ads

कामगारांच्या हितासाठी भारतीय मजदूर संघ सदैव तत्पर- मनोज बिट्टुरवार

घुग्घूस :- खाणीत काम करीत असताना कामगारांना जीवावर उदार होऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागते. या कामगारांच्या न्याय हक्कासाठी भारतीय मजदूर संघ सदैव तत्पर असून कामगारांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे मत भारतीय कोयला खदान मजदूर संघटनेचे नायगाव अध्यक्ष मनोज बिट्टूरवार यांनी व्यक्त केले.Bharatiya Mazdoor Sangh is always ready for the welfare of workers - Manoj Bitturwar.
या कार्यक्रमाला बी एम एस चे विजय मालवी, प्रमोद वंजारी ,चंद्रकांत कापटे, रमेश खरपकर, वामन काकडे, संजय किनहिकर, आदींची उपस्थिती होती.
यावेळी भारतीय मजूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दत्तोपंत ठेंगडी यांनी 23 जुलै 1955 ला यावर्षी भारतीय मजदूर संघाची स्थापना करून खाणीत काम करणाऱ्या कामगारांना न्याय देण्याचा निरंतर प्रयत्न केला. यावेळी विजय मालवी यांनी म्हटले की खान कामगारांना न्याय देण्यासाठी ही संघटना सदैव अग्रेसर असून आजवरच्या इतिहासात भारतीय मजदूर संघाने खान कामगारांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली .त्यामुळे खान कामगारांमध्ये भारतीय मजदू संघावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे आपल्या मार्गदर्शनात म्हटले. यावेळी अनेकांनी आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद वंजारी यांनी, आभार वामन काकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करता अक्षय पंडिले, मयूर हे पट , जीवन मते, सुनील बिपटे ,अशोक धोत्रे, विनोद हट्टेवार आदींनी परिश्रम घेतले. यावेळी येथील चारही कामगार संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment