Ads

अतिवृष्टीच्या नुकसानीची तातडीने मदत मिळण्यासाठी निवेदन

घाटंजी तालुका प्रतिनिधी :-दि. १९ जुलै ते २२ जुलै २०२३ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे व घराचे नुकसानी मुळे झालेल्याना तातडीने मदत मिळण्याबाबत सतिश रेड्डी (सरपंच ग्रा.प. कुर्ली ), आकाश नडपेलवार (सरपंच ग्रा.प चिखलवर्धा), आकाश आत्राम (जिल्हा उपाध्यक्ष युवक कॉंग्रेस यवतमाळ) यांनी एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री मुंबई यांना निवेदन सादर करून अतिवृष्टीच्या नुकसानीची तातडीने मदत मिळण्यासाठी मागणी केली आहे.Petition for immediate assistance for flood damage
दि. १९ जुलै ते २२ जुलै २०२३ दरम्यान झालेल्या पावसात घाटंजी तालुक्यातील सायफळ, कुर्ला, ताडसावळी, घोटी, चिखलवर्धा, बिलायता, सावंगी, वधारा, सावरगांव, ठाणेगांव, सगदा यासह बऱ्याच गावातील शेतकऱ्यांचे शेतात पाणी शिरल्याने व घराचे अतोनात नुकसान झाल्याने मोठे संकट कोसळले आहे. तरी आपल्या स्तरावरून पंचनामे करण्याचे आदेशित करून भयभीत झालेल्या जनतेला ताडडीने सरसकट मदत जाहीर करावी. यात ३१ जुलै २०२३ ही विमा काढण्याची अंतिम तारीख असल्याने बहुतांश शेतकरी विमा काढण्यापासून वंचित आहे. तो निकष या नुकसानीत न लावता सरसकट भरपाई दयावी. असे निवेदन सादर करण्यात आले. तसे न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अथवा उपोषण करण्यात येईल. याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील असे चिखल वर्धा येथिल सरपंच आकाश नडपेलवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment