Ads

HRG ट्रान्सपोर्ट कंपनीच्या परप्रांतीय कामगारां विरोधात काँग्रेसचा एल्गार

घुग्घूस : HRG ट्रान्सपोर्ट कंपनीच्या परप्रांतीय कामगारां विरोधात काँग्रेसचा एल्गार परप्रांतीय कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन करा : ठाणेदारांना निवेदनातुन मागणी पैनगंगा मुंगोली कोळसा खाणीतु Panganga Mungoli Coal Mine कोळसा वाहतूक करण्याचा कंत्राट हरिराम गोधरा (HRG) या कंपनीने घेतला असून स्थानिक बेरोजगार युवकांना कामावर न घेता राजस्थान येथून मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आणले आहेत.Elgar of Congress against migrant workers of HRG Transport Company
या परप्रांतीय कामगारा विरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून येत्या आठवड्यात कंपनी विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
या कंपनीने बाहेरून आणलेले कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात आले नसून हे खरेच कामगार आहेत की कुख्यात गुंड यांची शहानिशा करने आवश्यक आहे कारण नुकताच येनाडी गावातील नागरिकाला हेच.आर. जी. कंपनीच्या जवळपास पंचवीस ते तीस गुंडांनी जबर मारहाण करीत वाहनातून अपहरण करण्याचा प्रकार घडला असून त्याची तक्रार सदर गृहस्थाने वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनला दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

त्या एकंदरीत हे परप्रांतीय कामगार शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक झाले असून या सर्व कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन, मायग्रँट सर्टिफिकेट व वाहतूक परवाना (ड्रायविंग परवाना) तपासणी करिता काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप - निरीक्षक साखरे यांना निवेदनातून केली आहे.

याप्रसंगी काँग्रेस नेते सुधाकर बांदूरकर,अलीम शेख,रोशन दंतलवार,विशाल मादर,रोहित डाकूर,जोगेंद्र भंडारी,आकाश चिलका,शहजाद शेख,देव भंडारी, सुनील पाटील,अभिषेक सपडी,रफिक शेख,साहिल सैय्यद,सन्नी कुम्मरवार,अंकुश सपाटे व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment