भद्रावतीत दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; मध्य प्रदेशातील दोघे ताब्यात

जावेद शेख | प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती : शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात भद्रावती पोलिसांना यश आले असून, दोन दुचाकी चोरीप्रकरणी मध्य प्रदेशातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी भद्रावती ते नागपूरदरम्यान तब्बल ७० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चोरट्यांचा माग काढला. या कारवाईमुळे दुचाकी चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.Two accused arrested after examining 70 CCTV footage; Theft of two motorcycles revealed

दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरी

पहिल्या घटनेत आंबेडकर नगर, भद्रावती येथील विजय गायकवाड यांची लाल-काळ्या रंगाची होंडा फॅशन प्रो मोटारसायकल (क्रमांक MH 34 AC 2410), अंदाजे १० हजार रुपये किमतीची, भद्रावती बसस्थानकाजवळून चोरीला गेली होती. याप्रकरणी ४ सप्टेंबर २०२६ रोजी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९१४/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसऱ्या घटनेत जेना, ता. भद्रावती येथील अमोल बेलेकर यांची यामाहा MT-15 मोटारसायकल (क्रमांक MH 34 CW 2624), अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची, भद्रावती-नागपूर मार्गावरील डॉली पेट्रोल पंप परिसरातून चोरीला गेली. याप्रकरणी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ९७४/२०२६, कलम ३०३(२) BNS अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

७० सीसीटीव्ही फुटेजमधून चोरट्यांचा माग

दोन्ही गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करताना भद्रावती पोलिसांनी भद्रावती ते नागपूरदरम्यान सुमारे ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेज तपासले. तांत्रिक तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी नागपूरपर्यंत धागेदोरे जोडत आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना ताब्यात घेतले.

मध्य प्रदेशातील दोन आरोपी ताब्यात

या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

१. आशुतोष अतीराम यादव (वय १९), व्यवसाय मजुरी, रा. सुनवारा, ता. धनोरा, जि. सिवनी, मध्य प्रदेश.

२. कमल मोहन दास (वय २०), व्यवसाय मजुरी, रा. घणसोर, ता. व जि. जबलपूर, मध्य प्रदेश.

पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी

भद्रावती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, प्रशांत शेंदरे, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, अनुप अस्तुनकर, योगेश घाटोळे, खुशाल कावळे, संतोष राठोड आणि मोनाली गारघाटे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

सुमारे ७० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोन दुचाकी चोरीप्रकरणांचा छडा लावल्याने भद्रावती पोलिसांच्या तपासकौशल्याचे कौतुक होत आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment