Ads

भद्रावतीत आढळले मृत अर्भक.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-शहरातील जंगल नाका परिसरात मुख्य रस्त्यावरील डिव्हायडर मध्ये दिनांक 22 रोज मंगळवार ला सकाळी एक नवजात मृत अर्भक आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मृत अर्भक हे पुरुष जातीचे आहे.Dead infant found in Bhadravati.
 सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आवश्यक ती कारवाई करीत पंचनामा केला व मृत अर्भकाला पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. प्रत्यक्ष दर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार एका कुत्र्याने हे मृत अर्भक तोंडात पकडून आणले होते. नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला असता कुत्र्याने हे अर्भक तेथेच टाकून पळ काढला. शहरात नवजात अर्भक सापडल्याची दोन   याआधी चंडिका मंदिराजवळ एक जिवंत नवजात अर्भक सापडले होते. त्यानंतर नगरपालिकेच्या घंटा गाडीमध्ये एक मृत अर्भक आढळले होते. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment