Ads

जनविकास सेनेचे 'जिल्हा रुग्णालय मुक्ती आंदोलन'

चंद्रपूर : मागील आठवड्यात चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयातील परिचारिका सीमा मेश्राम यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यामुळे या रुग्णालयाच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. रुग्णालयातील दुरावस्थेच्या विरोधात जन विकास सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून जनविकास सेनेने संस्थापक अध्यक्ष मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात 'जिल्हा रुग्णालय मुक्ती आंदोलन पुकारले आहे. बुधवार दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सामान्य रुग्णालयाच्या समोर एक तासाचे निदर्शने करून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
Jan Vikas Sena's 'District Hospital Liberation Movement'
रूग्णालयात रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. अनेक डॉक्टर्स हजेरी लावून पगार घेतात. परंतु रुग्णसेवेचे काम करत नाही. सोनोग्राफीसारख्या तपासणीसाठी रुग्णांना अनेक महिने वाट पाहावी लागते. औषधीचा पुरेसा साठा नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधी घ्यावी लागते. अशा अनेक समस्यांनी या रुग्णालयाला ग्रासलेले आहे. या सर्व समस्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याची भूमिका जनविकास सेनेने घेतली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने तात्पुरत्या स्वरूपात 3 वर्षांकरिता सामान्य रुग्णालय अधिष्ठाता यांना हस्तांतरित केले होते.मात्र मागील 8 वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाने स्वतःचे रुग्णालय तयार केले नाही.वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.काही रुग्णांचे उपचाराअभावी जिव जात आहे. सामान्य रुग्णालय व शंभर खाटांच्या प्रस्तावित महिला रुग्णालयाची इमारत जिल्हा शल्य चिकित्सक यांना परत करावी ही जनविकास सेनेची मागणी आहे. सामान्य रुग्णालय व प्रस्तावित महिला रुग्णालयाची इमारत वैद्यकीय महाविद्यालयाच्या तावडीतून मुक्त होईपर्यंत जनविकास सेनेचे आंदोलन सुरू राहील.
.....पप्पू देशमुख

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment