घाटंजी (तालुका प्रतिनिधी):- तालुक्यातील आदिवासी बहुल,दुर्गम व डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या माणूसधरी ग्राम पंचायती अंतर्गत पाच गावे येतात. या ठिकाणी कोणत्याही महत्वाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्याचे ठिकाण म्हणजे घाटंजीलाच यावे लागते.मात्र ठिकाणावरून जाणे येणे करणाऱ्या मांजरी ते माणूसधरी रस्त्याची एवढी दुरवस्था झाली की,अक्षरशः जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने जनतेचे मोठे हाल होत आहेत.या बाबीची कल्पना लोकप्रतिनिधींना माहित असून सुद्धा त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव पुढे येत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत अश्या लोकप्रतिनिधींना गट ग्राम पंचायत मधिल गावात गाव बंदी करणार असल्याचे बोलल्या जात आहे.
माणूसधरी गट ग्राम पंचायत अंतर्गत केळापूर (तांडा), रत्नापुर, वागदा, केळापूर गाव अश्या पाच गावाचा समावेश होत असून आदिवासी बहुल जनता वास्तव्यास आहेत.या ठिकाणच्या जनतेला,रुग्णांना, शाळकरी विद्यार्थ्यांना मुख्य बाजारपेठेसह दवाखाना,शाळेत जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे.मात्र त्याची एवढी दयनीय अवस्था झाली आहे की,या रस्त्याने वाहन तर सोडाच साधे पायदळ सुद्धा चालणे कठीण झाले आहे.हा भाग जंगलांनी व झाडे झुडपाणी व्यापले असून जंगली प्राण्यांचा वावर असतो.अश्यातच हा भयानव रस्ता त्यामुळे जनतेत मोठी भीती निर्माण झाली आहे. येथिल विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागत असल्याने बहुतांश मुले रस्त्याचे कारण पुढे करून शाळेला दांडी मारत आहे.अश्यात त्यांची शैक्षणिक मोठी नुकसान होत आहे.यात रुग्णाच्या बाबतीत विचार न केलेला बरा. एखादी गंभीर रुग्ण किंवा गरोदर मातेस या रस्त्यानी नेताना मोठी कसरत करावी लागते.यात त्यांचे कधी बरे वाईट होईल ही बाब नाकारता येत नाही.यातच मागील पावसात माणूसधरी नजिक मोठा नाला म्हणून परिचित असलेल्या पुलावर मधोमध मोठा भगदाड पडल्याने या रस्त्याने मार्गक्रमन कसे करावे असे विविध प्रश्न जनतेसमोर उभे ठाकले आहे.मागील काळात या रस्त्याने रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात झाली.यातून शासनाला महसूल सुद्धा मिळाला मात्र यात रस्त्याची चाळन झाली.ही बाब प्रशासनाच्या लक्षात न येणे एक संशोधनाचा विषय आहे.या रस्त्याविषयी या भागाचे आमदार यांना कल्पना दिली.मात्र त्यांनी याबाबिकडे लक्ष न देणे गंभीर आहे. एकीकडे समृध्दी महामार्ग या रस्त्याचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान विदर्भात येवून करतात.सोबतच विदर्भातील केंद्रीय मंत्री रस्ता विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याचे वल्गना करतात.मग डोंगराळ भागात वसलेल्या माणूसधरी रस्त्याचे काय असा सवाल जनता करीत असून या भागातील जनतेचा अंत न पाहता मांजरी ते माणूसधरी रस्ता तातडीने करावा व त्यावरील मोडकळीस आलेले पुल त्यावर पडलेले भगदाड दुरुस्त करावे अशी मागणी होत असून हा रस्ता तातडीने न केल्यास माणूसधरी गट ग्राम पंचायत अंतर्गत मधील जनता येणाऱ्या निवडणुकीत गावबंदी करणार असल्याच्या विचारात असून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय सचिव राजू चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0 comments:
Post a Comment