तालुका प्रतिनिधी( भद्रावती)
जावेद शेख :-येथील नगरपरिषद तर्फे शहरातील मदिना मज्जिद मैदानावर मुस्लिम समाजाचे समाज भवन बांधण्यात आले आहे. या समाजभवनाचे लोकार्पण दिनांक 18 रोज शुक्रवारला सायंकाळी सात वाजता आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते संपन्न होत आहे. Inauguration of Muslim Samaj Bhawan at Bhadravati today
याप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मदिना मस्जिद कमिटीचे मुनाज शेख ,न.प. उपाध्यक्ष संतोष आमने, मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी, नगरसेवक जावेद शेख, निलेश पाटील, अनिता मुळे, उपअभियंता न.प. आर एस गुप्ता, एडवोकेट एम. आर. शेख ,डॉक्टर शकील ,बसीर भाई , मजर भाई अबू कुरेशी इजाज अली आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती राहणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मदिना मस्जिद कमिटीचे मुनाज शेख यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment