Ads

भिकेश्वर जवळ दुचाकीस्वार ला जब्बर धडक देवुन फरार झालेला ट्रकचालकाच्या नागभीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या.!

(प्रशांत गेडाम)नागभीड : दुचाकीस्वार आशिष मस्के या तरुणाला धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार ट्रकचालकाला वाहनासह नागभीड पोलिसांनी बुधवारी अटक केली. बाबीसिंग चरणसिंग वय- 47 रा.टेका नाका, नागपूर असे आरोपीचे नाव आहे.The truck driver, who ran away after hitting a two-wheeler near Bhikeshwar, was arrested by police.
सविस्तर वृत्त असे की,
नागभीड मार्गावर 17 ऑगस्ट 2023 रोजी भिकेश्वरजवळ आशिष चोखेश्वर मस्के वय-24 हा युवक नागभीडकडून ब्रह्मपुरीकडे दुचाकीने जात होता. दरम्यान, ट्रकने दुचाकीस्वार आशीष ला जब्बर धडक देऊन ट्रक चालक बाबीसिंग चरणसिंग फरार झाला होता‌. सदर अपघाताची नागभीड पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळावरून जखमी युवकाला नागभीड ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. यासंदर्भात पोलिस ठाण्यात भादंवि 279, 304 (अ) सहकलम 184, 134 / 177 मोवाका अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास नागभीड पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे यांचा मार्गदर्शनाखाली पीएसआय साखरे, पोलिस नाईक मूल्यमवार, तुमसरे, शेंडे यांनी जलद गतीने तपास करून आरोपी वाहन चालक बाबीसिंग चरणसिंग हा एमएच 34 एव्ही 0157 क्रमांकाचा ट्रक घेऊन नागभीड परिसरात आला होता, अशी माहिती चौकशीत पुढे आली. पोलिसांनी नागपूर व वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला नागपुरातून ट्रकसह अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असुन ट्रक पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आलेला आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment