Ads

वाळू तस्करीत आडकाठी ठरल्याने सामूहिक हमला

ब्रम्हपुरी :-चिखलधोकडा घाट मालकाकडे दिवाणजी म्हणून काम करणाऱ्या किशोर चौधरी याने अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन महसूल विभागाला पकडून दिल्याचा राग मनात धरून चार लोकांनी दिवाणजी तसेच आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांचा राहत्या घरासमोर त्याला व त्याच्या पत्नीला रात्रौच्या सुमारास जोरदार मारहाण केल्याची घटना अऱ्हेर नवरगाव येथे घडली असून सदर प्रकरणाची तक्रार ब्रम्हपुरी पोलिसांत दाखल करण्यात आलेली आहे.Mass attack due to obstruction of sand smuggling
वाळू तस्करी करणाऱ्यांची हिम्मत आजघडीला एवढी वाढली आहे की, कुणी त्यांच्या धंद्यात त्यांना त्रास दिला तर त्याचा "काटा" कसा काढायचा याचा तस्करीत जुळलेले लोक "प्लॅनिंग" "Planning" करत असतात.अशाच एका घटनेत चिखलधोकडा वाळू घाटावर दिवाणजी असलेल्या किशोर पंढरी चौधरी रा.अऱ्हेर नवरगाव याने अवैध वाळू तस्करी करणाऱ्या आदित्य मिसार याच्या वाहनावर कारवाई साठी महसूल विभागाला माहिती दिल्याने त्या विभागाने वाहनावर कारवाई केली असल्याचा संशय घेत त्याचा राग मनात धरून आदित्य मिसार रा.कन्हाळगाव,सुरज तलमले रा. भालेश्वर, राजू मनोहर राऊत व सुरज राजू राऊत दोन्ही अऱ्हेर नवरगाव यांनी 01/09/2023 शुक्रवारी 8:30 वाजता वाळू घाट दिवाणजी किशोर पंढरी चौधरी रा.अऱ्हेर नवरगाव यांच्या घरी जाऊन त्यांना "माझा ट्रॅक्टर का पकडून दिला" म्हणून शिवीगाळ व मारहाण केली पत्नी आपल्या पतीला वाचविण्यासाठी आली असता त्यांना सुद्धा शिवीगाळ करीत धक्का देतं बाजूला पाडले. घराशेजारील काही लोक व सरपंच मदतीला धावून आले असता.किशोर चौधरी यांनी पोलीस मदत केंद्र क्रमांक 112 वर फोन केल्याने घटनास्थळी पोलिस दाखल झाले. ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनं येथे जात किशोर चौधरी यांनी आदित्य मिसार रा.कन्हाळगाव,सुरज तलमले रा. भालेश्वर, राजू मनोहर राऊत व सुरज राजू राऊत दोन्ही अऱ्हेर नवरगाव यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तर पोलिसांनी कलम 294,323,34 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment