Ads

शासकीय जागेतून रस्ता करून देण्यासाठी सरपंचाने मागितले 20लाख रुपये

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही-सिंदेवाही तालुक्यातील मौजा रत्नापुर येथील सर्वे क्र 983/1 आ 0,94 हे आर ही शेतजमीन धर्मानंद नागदेवते व लता देवेंद्र नागदेवते यांच्या कडून मातृभूमी रियल इस्टेट चे मालक राजू भैसारे यांनी विकत घेऊन त्याची सर्व कागदपत्रे आपल्या नावे करून घेतली परंतु भैसारे यांना शेतात जाणे येणे करण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी मा. तहसीलदार यांचेकडे रीतसर अर्ज केला व रस्ता करून देण्याची मागणी केली होती.
The sarpanch asked for 20 lakh rupees to make a road through the government premises
त्यानुसार मा. नायब तहसीलदार धात्रक साहेब रत्नापुर येथील तलाठी आकरे आणि मंडळ अधिकारी नवरगाव यांनी मोक्का चौकशी करून सदर शेतमालकास महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार शेतमालकास मौजा नवरगाव सर्वे क्र. 19 आराजी 0.60हे. आर या सरकारी पडीत जमिनीतून उत्तर दक्षिण 8 फूट व दक्षिण टोकापासून ते सर्वे क्र 983 /1 पर्यंत जाण्यायेण्याकरिता रस्ता मंजुर केल्याचा आदेश दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी काढला सादर सर्वे क्र. 19 ही पडीत जमीन सिंदेवाही चिमूर या राज्य मार्गाला लागून आहे. वास्तविक ही पडीत जागा सरकारी महसूल विभागाची आहे मात्र नवरगाव येथील सरपंच राहुल बोडणे यांनी आपले राजकीय वजन वापरून ग्राम पंचायत चा ठराव घेऊन मा. तहसीलदार यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचा आदेश रद्द करायला लावले परंतु मा. तहसीलदार यांनी याबाबतची साधी सूचना किंवा नोटीस देखील राजू भैसारे यांना दिल्या गेला नाही. हे नियमाला धरून नसून एका जबाबदार अधिकाऱ्याने राजकीय वजनाला बळी पडून नियमबाह्य आदेश काढल्याचा आरोप राजू भैसारे यांनी पत्रकार परिषदेत केला त्या नंतर रद्द केलेल्या आदेशाची प्रत घेऊन सरपंच राहुल बोडणे हे माझ्या ऑफिस मध्ये येऊन मला त्याच जागेतून रस्ता करून देण्यासाठी 20लाख रुपयांची मागणी केली असल्याचे राजू भैसारे यांनी विशेष करून सांगितले आहे.
एकच गोष्ट सिद्ध होते की, राजकीय वजन वापरून
अधिकारी लोकांना हाताशी धरून खंडणी वसूल करणे हा एकमेव उद्देश राहुल बोडणे याचा असल्याचा सांगीतले. आणि बोडणे यांच्यावर या आधी पण पोलीसात गुन्हे दाखल आहेत. असा आरोप मातृभूमी रियल इस्टेट चे मालक
राजू भैसारे यांनी पत्रकार परिषदेत केला असून याची तक्रार देखील त्यांनी सिंदेवाही पोलिस ठाण्यात केली असल्याचे सांगितले असून या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी वर्गावर कार्यवाही करून मागील 10 महिन्यापासून मला खंडनि करिता त्रास देऊन माझें मानसिक संतुलन बिघडले आहे. यामुळे मला आणि माझ्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. मला न्याय न मिळाल्यास मी आत्महत्या करणार आणि याला जबादार या प्रकरणातील सर्व दोषी आणि अधिकारी लोक असतील असे पत्रकार परिषदेत सागितले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment