Ads

वेकोलि कामगारांच्या पगारवाढीत कपात केल्यास कोळसा उद्योगात कामबंद आंदोलन

चंद्रपूर : वेतन करार - ११ अंतर्गत वेकोलि कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मंजूर करण्यात आली. मात्र, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वेतनवाढीविरोधात कोर्टात धाव घेतल्याने देशभरातील अडीच लाख वेकोलि कर्मचाऱ्यांची वेतनवाढ अधांतरी थांबली असून, या अन्यायाविरोधात वेकोलि कर्मचारी ऑक्टोबर महिन्यात ५ ते ७ ऑक्टोबरपर्यंत कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे सुधीर घुरडे यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.Strike strike in coal industry if salary increase of coal workers is cut
वेकोलिमध्ये अधिकाऱ्यांचा वेतन करार दहा वर्षाचा असतो तर कामगारांचा पाच वर्षांचा असतो. वेतन करार ११ नुसार १९ टक्के वेतनवाढ दिल्याने काही अधिकाऱ्यांपेक्षा कामगारांचे वेतनात अधिक वाढ झाली. मात्र, याला वेकोलिचे वरिष्ठ अधिकारीच कारणीभूत असून, सेवानिवृत्तीजवळ आलेल्या काही वेकोलि अधिकाऱ्यांनी वेतनवाढीचा लाभ मिळविण्यासाठी वेतन करार पाच वर्षांचा केला होता. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर विद्यमान अधिकाऱ्यांना याचा फटका बसला आहे. परंतु, वेतन कराराला विरोध करीत वेकोलि अधिकाऱ्यांनी कोर्टात धाव घेत वेतनवाढीला विरोध केला आहे. मात्र, कामगारांवर अन्याय होणार आहे. अडीच लाख कर्मचाऱ्यांचे वेतन यामुळे प्रभावित होणार असून, कामबंद आंदोलनाची सूचना वेकोलि अध्यक्षांना देण्यात अली. वेकोलितील सर्वच संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वेकोलि कामगारांच्या आंदोलनामुळे देशाभरातील कोळसा उत्खनन प्रभावित होणार असून, याला वेकोलि व्यवस्थापन जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला नामदेव देशमुख, जोगेंद्र यादव, सचिन हनमंते, रंजित पटले उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment